Ram Mandir चं उद्घाटन अन् गर्भवती मातांची अनोखी मागणी; अयोध्येतील अजब प्रकार
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील गर्भवती मातांनी एक अजब मागणी केली. त्यांच्या मागणीमुळे रुग्णालय प्रशासन देखील चक्रावून गेलय. काय आहे हा प्रकार? पाहूयात…
Devara Teaser: अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या ‘देवरा’ची पहिली झलक आली समोर
अयोध्येमध्ये 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. त्यामुळेच अयोध्येमध्ये ज्या गर्भवती मातांची प्रसूतीची तारीख 22 जानेवारीच्या आसपास आहे. त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की, आमची प्रसूती ही 22 जानेवारीलाच करण्यात यावी. त्यासाठी या महिलांनी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज करायला सुरुवात केली.
Ram Mandir : प्रभु श्रीरामांची अयोध्या कुणी वसवली? इतिहास काय सांगतो?
मात्र या महिलांच्या या अजब मागणीमुळे रुग्णालय प्रशासनाला मोठा प्रश्न पडलाय. कारण अशाप्रकारे या महिलांची प्रसूती 22 जानेवारीला करणं म्हणजे ती सामान्य पद्धतीने न करता शस्त्रक्रियेने करावी लागणार. तसेच एक रुग्णालयात एका दिवशी सामान्यपणे 14 ते 15 शस्त्रक्रिया करतात. त्यांच्याकडे आता थेट 35 अर्ज आल्याने त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियांचे नियोजन करावे लागणार असल्याचं एका रुग्णालयाच्या प्रसुती विभाग प्रमुखांनी सांगितलं.
शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, 19 व्या दिवशी सर्वात कमी कमाईची नोंद
तर 22 जानेवारीला आपली प्रसुती करण्यात यावी. अशी मागणी करणाऱ्या एका गर्भवती मातेने प्रतिक्रिया दिली आहे की, रामलल्लांच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा. अशी आमची इच्छा आहे. कारण गेल्या शंभर वर्षांपासून आम्ही राम मंदिर निर्माण होण्याची वाट बघतोय. त्यामुळे 22 जानेवारी हा दिवस आमच्या बाळाचे या जगात आगमन होण्यासाठी एक सुदैवयोग असेल असेही महिला म्हटले.
दरम्यान अशाप्रकारे गर्भवती महिलांनी किंवा संबंधित दांपत्यांनी डॉक्टरांकडे विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळी प्रसूती व्हावी अशी मागणी करण्याची काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा अशा प्रकारची मागणी केली जाते. कारण कोणीतरी सांगितलेल्या मुहूर्तावरच बाळाला बाळाचा जन्म व्हावा. अनेकदा आई किंवा वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी बाळाचा जन्म व्हावा. अशी देखील मागणी केली जाते. अशावेळी डॉक्टरांकडून मुदतपूर्व आणि शस्त्रक्रिया पद्धतीने ही प्रसूती करावी लागते. मात्र अशा प्रकारची प्रस्तुती गर्भवती मातेच्या आणि बाळाच्या जीवावर बेतणारी देखील ठरू शकते. असे डॉक्टर सांगतात.