Ravindra Dhangekar यांना लोकसभेची हसीन स्वप्न पडताय; चंद्रकांत पाटलांवरील टीकेवर भाजपचा टोला
Ravindra Dhangekar : कसब्यातील कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना हसीन स्वप्न पडू लागली आहेत. त्यांना लोकसभेची हवा लागली आहे. धंगेकर हे हवा भरलेला फुगा आहे. त्यामुळे त्यांना आता कोथरूड मतदारसंघातील लोकाची चिंता वाटत आहेत. असा टोला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लगावला आहे. धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर घाटे यांनी हो टोला लगावला.
कतरिनाने विजय सेतुपतीसह खास फोटो शेयर करत ‘मेरी ख्रिसमस’ च्या प्रमोशनमध्ये आणली बहर
यावेळी बोलताना घाटे म्हणाले की, काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. ते सुसंस्कृत आमदार आहेत. महाराष्ट्रातील सगळे गुन्हेगार कसबा पोटनिवडणुकीत भाजपने उतरवले होते. तसेच कोथरूडमधल्या गुन्हेगारांना भाजपचा आश्रय असल्याचा धंगेकर यांनी केला होता. तो बिनबुडाचा आरोप आहे.
Sonu Sood: ‘सोनू सूदने आगामी सिनेमा ‘फतेह’बद्दल सांगितली ही खास गोष्ट !
कोथरूड शैक्षणिक आणि सुसंस्कृत आहे. चंद्रकांत पाटील यांच काम चांगल सुरू आहे. कोथरूडमध्ये सगळ्यांसाठी नेतृत्व करणारे चंद्रकांतदादा आहेत. धंगेकर हे विनाकारण त्यांच्यावर टीका करतात त्याचा निषेध व्यक्त करतो. भाजप राज्यात चांगल काम करतेय. फडणवीस गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सांगितले तसे पोलीस काम करत आहेत.
Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi
रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. असं बोलण चुकीच आहे. तर धंगेकर यांना हसीन स्वप्न पडू लागली आहेत. त्यांना लोकसभेची हवा लागली आहे. धंगेकर हे हवा भरलेला फुगा आहे. त्यामुळे त्यांना आता कोथरूड मतदारसंघातील लोकाची चिंता वाटत आहेत. ठेकेदारांच्या गर्दीत धंगेकर अडकले आहेत. ते विकास काम करत नाहीत. फक्त निधीवरून राजकारण करत आहेत.
Share Market : अखेरीस गेम पलटला; सेन्सेक्समध्ये वाढ, गुंतवणूकदारांची चांदी
२०२४ विधानससभेला कसब्यात महायुतीचा उमेदवार निवडून येईल. पक्ष कमळ असेल पण महायुती म्हणून निवडून येईल. पक्ष देईल तो उमेदवार निवडून येईल. पुणे लोकसभेत मीच उमेदवार असेल अस धंगेकर यांना वाटत आहे. पुणे लोकसभा उमेदवार हा महायुतीचाच निवडून येईल. शरद मोहोळ व चंद्रकांत पाटील यांची एकही भेट झाली नाही. स्वाती मोहोळ या काही म्हणणं मांडण्यासाठी त्या फडणवीस यांना भेटल्या आहेत.
नितेश राणे यांनी काल (8 जानेवारी) शरद मोहोळ कुटूंबियांना भेटले. यावेळी त्यांनी स्वतःच मत मांडल. ते पक्षाच मत नाही. पक्षा कडून काही म्हणणं आलेलं नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पार्टी आणि स्वतःच मत मांडले आहे. तर मुक्ताताईंच्या निधीवर धंगेकर यांनी डल्ला मारला आहे. धंगेकर कायम अधिकारी यांना मारहाण आणि धमकी देत असतात. असा आरोप भाजपच्या घाटे यांनी केला आहे.