Sonu Sood: ‘सोनू सूदने आगामी सिनेमा ‘फतेह’बद्दल सांगितली ही खास गोष्ट !
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ रुपेरी पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद अनेक लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या (Corona) काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. आजही त्याच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांना रांग लागलेली असते. केवळ गरजू लोकच नाही तर, अभिनेत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत करण्याचा वसा हाती घेतला आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट ‘फतेह’साठी (Fateh Movie) दिग्दर्शनाच्या भूमिकेत उतरला आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट या वर्षात रिलीज होणार असून आज देशभरात होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर बारकाईने नजर टाकणार आहे. वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित डिजिटल युगातील सायबर धोक्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांचं मनोरंजन करणे आणि साध्या सोप्या पद्धतीने ते कसं टाळता येणार आहे, हे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. सोनूने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करून कॅप्शन दिल आहे. ‘फतेह’ हा माझ्यासाठी खास आणि वैयक्तिक चित्रपट आहे. विविध स्तरांवर सायबर गुन्ह्यांचा बळी ठरलेल्या तरुणांना ही श्रद्धांजली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन , निर्मिती आणि अभिनय केलेल्या सोनू सूदसाठी फतेह हा खास आहे. त्याने या चित्रपटासाठी आपर मेहनत घेतली आहे. अनोख्या शूटिंग लोकेशन्सवर हा चित्रपट शूट झाला असून आदरणीय हॉलीवूड स्टंट करणाऱ्या ली व्हिटेकर यांच्या सोबत हे सहकार्य असणार आहे. ‘फतेह’ झी स्टुडिओज आणि त्यांची निर्मिती कंपनी शक्ती सागर प्रॉडक्शन सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या सह-निर्मिती असणार आहे.
सोनू सूदचं कायम सर्व स्तरातून खूप कौतुक होत असतं. सोशल मीडियावर त्याचे अनेक वेगवेगळे उपक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. नुकतेच सोनूच्या एका चाहत्याने त्याला रक्ताने बनवलेले पेंटिंग भेट म्हणून दिले होते. सोनूने चाहत्याला सल्ला देताना म्हटले होते की, ‘रक्तदान करून एखाद्याची मदत करा. माझे असे पेंटिंग बनवून ते वाया घालवू नका!’.
Jasmin Bhasin : ‘वॉर्निंग 2’साठी स्मिन भसीनने केले पहिल्यांदा पंजाबी डबिंग
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न तो करत असतो. अनेक गरजू लोक सोशल मीडियाद्वारे अभिनेता सोनू सूदला टॅग करून मदतीचे आवाहन करताना दिसत असतात.