Corona Alert : साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! नो मास्क नो दर्शन, मंत्री राधाकृष्ण विखेंचा आदेश

Corona Alert : साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी!  नो मास्क नो दर्शन, मंत्री राधाकृष्ण विखेंचा आदेश

Corona Alert : देशात कोरोनाने (Corona Alert) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासानाकडून करण्यात येत आहे. तसेच मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याने केंद्रने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साई बाबांचे दर्शन घ्यायचे असेल तर मास्क सक्ती करण्यात आली आहे. नो मास्क नो साई दर्शन असे आदेश खुद्द राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

Public Holidays 2024 : नवीन वर्षात तब्बल नऊ ‘लाँग विकेंड’; महाराष्ट्रातील 24 सुट्ट्यांची यादी जाहीर

पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आहेत. रोगाच्या प्रादुर्भावाने आपले प्राण देखील गमावले लागले आहे. पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यातच ख्रिसमस नववर्ष हे असल्याने शिर्डीमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.

Mumbai : RBI सह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवलेत; धमकी देत सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी

जमावाच्या ठिकाणी या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरू शकतो. या पार्श्वभूमीवर आता मंदिरामध्ये यायचं असेल तर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. नाहीतर साईचे दर्शन घेता येणार नाही. असे आदेश खुद्द विखे पाटील यांनी दिले. प्रादुर्भाव वाढू नये. या उद्देशाने करण्यात आले. असल्याची माहिती यावेळी मंत्री विखे यांनी दिली.

यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थानकडून मास्क पुरविले जावे. तसेच मंदिराच्या दर्शनी भागामध्ये आज निदर्शनाचा मोठा बोर्ड देखील लावण्यात यावा. अशा सूचना विखे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर मन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी. असे आव्हान देखील आरोग्य यंत्रणे कडून करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube