Pune : खासदार सोडा आमदारही होऊ देणार नाही; धंगेकरांना भाजप शहराध्यक्षांचं ओपन चॅलेंज!

Pune : खासदार सोडा आमदारही होऊ देणार नाही; धंगेकरांना भाजप शहराध्यक्षांचं ओपन चॅलेंज!

Pune : पुण्यातील (Pune) कसब्यात निवडून आलेले <strong>काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे तात्पुरते आमदार आहेत. आता पुण्याच्या लोकसभेत कसब्याचं उट्टं काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहणार नाही. असं म्हणत भाजपच्या पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कॉंग्रेस आणि धंगेकराना खुलं आव्हान दिलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज करा, इतकं मारा की…

यावेळी धीरज घाटे म्हणाले की, पुण्यातील (Pune) कसब्यात निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे तात्पुरते आमदार आहेत. आता पुण्याच्या लोकसभेत कसब्याचं उट्टं काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून येणार. महापालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार. कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे आणि लोकसभची जागा सुद्धा वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने निवडून आणत आहोत. तसाच यंदाही निवडून आणू असा विश्वास भाजपच्या पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार ‘अ‍ॅनिमल’; कुठे अन् कधी पाहाल?

दरम्यान भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर पोट निवडणूक झाली होती. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. याच दरम्यान भाजपने टिळक यांच्या घरातील उमेदवार न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तेथेच भाजपच्या पराभव निश्चित झाल्याचं बोललं जात होतं.

Javed Akhtar : पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

तर दुसरीकडे काँग्रेसने सक्रिय कार्यकर्ते असणारे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत निवडून आणलं. काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाला संजीवनी मिळाल्याचे देखील बोलला जात होतं. तसेच काँग्रेसचा हा विजय एका अर्थाने महाविकास आघाडीचाच विजय होता. त्यामुळे या विजयाने एकंदरीतच संपूर्ण आघाडीला बळ मिळालं होतं.

तर मुक्ता टिळक यांच्या घरातील किंवा ब्राह्मण उमेदवार न दिल्याने. कसब्यातील भाजपचा बहुसंख्य ब्राह्मण समाज असलेला मतदार वर्ग नाराज झाल्याचे देखील यावेळी चर्चा होत्या. मात्र या पराभवानंतर भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज