शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसण्याचा अंदाज

18 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान काही भागांत परतीचा पाऊस हजेरी लावू शकतो.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 17T141535.211

Good news for farmers : राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावंत गडद होत असून, ऑक्टोबर हिटमुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा चढला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान काही भागांत परतीचा पाऊस हजेरी लावू शकतो. मात्र, हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नसून, काही ठिकाणीच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतून माघारी फिरल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. याशिवाय गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागांतून तसेच झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतूनही मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र, देशातील काही भागांत आगामी दिवसांत हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज असून, उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून वातावरणात बदल होऊ शकतो. दसऱ्यानंतर म्हणजेच 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा रिमझिम सरी पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य पावसाचा फायदा रब्बी हंगामातील पेरण्यांना आणि विशेषतः ज्वारीच्या पिकाला होऊ शकतो. मात्र, पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता असून, काही भागांत पाऊस पडेल, तर काही ठिकाणी हवामान कोरडेच राहू शकते, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांसह 10 ते 11 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागांत परतीच्या पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणीही पाऊस पडू शकतो. मात्र, या भागांत सर्वदूर पाऊस होईलच असे नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या या अंदाजाकडे लक्ष ठेवावे. पेरणीचे नियोजन करताना स्थानिक हवामानाचा अंदाज आणि जमिनीतील ओलावा यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक भागांत पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडण्याचा आणि शेतीपिकांचे नुकसान होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागांत जोरदार हिमवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

‘पप्पू’ म्हणून हिणवलं गेलेलं राहुल गांधी कसे झाले ‘पॉवर फुल्ल’; पडद्यामागे आहेत 7 मोहरे

एकीकडे महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट आणि पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीचा पाऊस काही भागांना दिलासा देऊ शकतो. मात्र, पंजाबराव डख यांचा हा अंदाज असून, प्रत्यक्ष पावसाची स्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

follow us