अभिजीत दिपकेला थोड्याच वेळात मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणणार; पोलिस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या!

Abhijeet Dipke Detained; आज (17 ऑक्टोबर) थोड्याच वेळात दिपकेंना नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आणलं जाणार आहे.

Abhijeet Dipke Detained

Abhijeet Dipke Detained: कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी 16 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतलं होतं. आज (17 ऑक्टोबर) थोड्याच वेळात दिपकेंना नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आणलं जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी तिरंगा फडकवल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला होता. या कारवाईच्या निषेधार्थ दिपके यांनी ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाचं आयोजन केलं होतं.

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेला घेतलं ताब्यात

मात्र, या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी मोर्चापूर्वीच दिपके यांना ताब्यात घेतलं. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला या कारवाईमुळे आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आंदोलकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

तिरंगा फडकवणे गुन्हा आहे? तर देशात ऑफिशिअली इमर्जन्सी लावा म्हणत दिपकेंचा पंतप्रधानांना सवाल

दरम्यान, अभिजीत दिपकेंना आज थोड्याच वेळात नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या समर्थनार्थ सीजेपीचे कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि इतर आंदोलक मंदिर मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. दिपके यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली आहे. आता दिपके यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि आंदोलनकर्ते पुढे कोणती भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागलं आहे.

follow us