कतरिनाने विजय सेतुपतीसह खास फोटो शेयर करत ‘मेरी ख्रिसमस’ च्या प्रमोशनमध्ये आणली बहर
Merry Christmas Katrina Kaif: ‘टायगर 3’ च्या शानदार यशाचा आनंद लुटणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान निर्मात्यांनी ‘मेरी ख्रिसमस’चा टायटल ट्रॅक (Merry Christmas Title Song ) रिलीज केला आहे. सध्या ‘मेरी ख्रिसमस’ च प्रमोशनल BTS मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
View this post on Instagram
अवघ्या काही दिवसांवर “मेरी ख्रिसमस” या चित्रपटाची रिलीज डेट आली असून बॉलीवूड दिवा कतरिना कैफने हिने पडद्यामागील खास BTS शेयर केले आहेत. सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून कतरिनाने अष्टपैलू अभिनेता विजय सेतुपती यांच्या समवेत जबरदस्त फोटो शेअर केला आहे.
कतरिना कैफने तिच्या सहकलाकार विजय सेतुपतीसोबत हा फोटो शेअर केल्या पासून त्यावर कॉमेंट्सचा वर्षाव होत असून आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता आहे. 12 जानेवारी 2024 हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज असून श्रीराम राघवन दिग्दर्शित “मेरी ख्रिसमस”, त्याच्या हिंदीमध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय अनेक कलाकार मंडळी आहेत. संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद , अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे ही कलाकार मंडळी यात दिसणार आहेत. ज्यामुळे स्क्रीनवर डायनॅमिक आणि वैविध्यपूर्ण कलाकार बघायला मिळणार आहे.
कतरिना कैफ- विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज
कालच ‘मेरी ख्रिसमस’ मधील “नजर तेरी तुफान” (Nazar Teri Tufan Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये उत्साहाचा वाढला आहे. मनमोहक चाल आणि मनमोहक गीतांनी हे गाणे संगीत उद्योगात धुमाकूळ घालत आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलेले “नजर तेरी तुफान,” हे गाणं पारंपारिक आणि समकालीन संगीताचा मिलाफ आहे. प्रीतमचा सिग्नेचर टच या गाण्यातून दिसून येतोय. पापोनने हे गाणे सुंदर गायले आहे आणि प्रख्यात गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी हे गाणं लिहिलं आहे.