बॉलिवूडची बिझनेस लीग ‘हे’ सात स्टार्स ज्यांनी स्टारडमचे यशस्वी ब्रँड्समध्ये रूपांतर केले

Shah Rukh Khan : कलाकार आता पडद्यावर प्रभावशाली भूमिका साकारण्यापुरते किंवा केवळ मनोरंजन उद्योगातच व्यवसाय उभारण्यापुरते मर्यादित राहिलेले

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : कलाकार आता पडद्यावर प्रभावशाली भूमिका साकारण्यापुरते किंवा केवळ मनोरंजन उद्योगातच व्यवसाय उभारण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते अभिनयाच्या पलीकडे जाऊन  फॅशन, तंत्रज्ञान, क्रीडा, स्किनकेअर आणि लाइफस्टाइल ब्रँड्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही वर्षांत व्यावसायिक क्षेत्रात स्मार्ट निर्णय घेणाऱ्या काही बॉलिवूड सुपरस्टार्सवर एक नजर…

शाहरुख खान

स्वतःला या उद्योगातील सर्वात यशस्वी अभिनेता-उद्योजकांपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि त्याच्या VFX विभागाच्या माध्यमातून चित्रपटांच्या पलीकडे विविध क्षेत्रांत पाऊल ठेवणाऱ्या ते पहिल्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक होते. त्यांच्या व्यावसायिक पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल नाइट रायडर्स क्रिकेट फ्रँचायझी, मुलगा आर्यन खानसोबतचा लाइफस्टाइल ब्रँड D’YAVOL, ज्यामध्ये सिंगल मॉल्ट व्हिस्की आणि उच्च दर्जाचे लक्झरी स्ट्रीटवेअर देखील समाविष्ट आहे, तसेच शैक्षणिक मनोरंजन क्षेत्रातील उपक्रम KidZania मधील गुंतवणुकीचाही समावेश आहे.

अभिषेक बच्चन

जयपूर पिंक पँथर्स आणि चेन्नईयिन FC सारख्या स्पोर्ट्स फ्रँचायझी, तसेच युरोपियन T20 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या उद्योजकीय क्षेत्राचा विस्तार सातत्याने केला आहे. त्यांनी Swiggy, VAHDAM Teas, Naagin Sauce यांसारख्या ब्रँड्समध्ये, तसेच अनेक तंत्रज्ञान आणि रिटेल उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे. ते Make In India उपक्रमालाही पाठिंबा देतात आणि व्यवसायाच्या मॉड्यूल्समध्ये या मंत्राचे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

जॉन अब्राहम

JA Entertainment, NorthEast United FC ची मालकी, मोटरस्पोर्ट्स फ्रँचायझी Goa Aces JA Racing, इतर स्पोर्टिंग लीग्समधील सहभाग आणि Subko Coffee, NOTO Ice Cream, आणि Epigamia यांसारख्या स्टार्टअप्समधील गुंतवणुकीच्या माध्यमातून चित्रपट आणि व्यवसाय यांचा यशस्वी समतोल साधला आहे.

रणबीर कपूर

बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली फिल्म कुटुंबांपैकी एका कुटुंबातून आलेले असूनही, त्यांनी स्वतःचा उद्योजकीय मार्ग तयार केला आहे. त्यांनी ARKS या ब्रँडच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात प्रवेश केला आहे, Mumbai City FC चे सह-मालक आहेत आणि Prozo, DroneAcharya, Beco, आणि Svami यांसारख्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

कतरिना कैफ

Nykaa सोबतच्या भागीदारीत Kay Beauty ची उभारणी करून त्याला भारतातील सर्वात यशस्वी सेलिब्रिटी ब्युटी ब्रँड्सपैकी एक बनवले आहे. या ब्रँडने अलीकडेच Space NK येथे यूकेमध्ये लॉन्च करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार केला असून, सर्वत्र त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दीपिका पादुकोन

आपल्या स्किनकेअर ब्रँड 82°E, KA Productions आणि Blue Tokai Coffee Roasters, Nua (wellness), आणि Bellatrix Aerospace (deep-tech space exploration) यांसारख्या अनेक ग्राहक आणि तंत्रज्ञान स्टार्टअप्समधील एंजल गुंतवणुकीद्वारे आपला व्यावसायिक पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे.

आलिया भट्ट

तिने लहान मुलांच्या ब्रँड, Ed-a-Mamma च्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे, ज्यामध्ये Reliance ने 51% हिस्सा विकत घेतला आहे, जो स्वतःमध्येच एक महत्त्वपूर्ण व्यवहार आहे. तिच्याकडे Eternal Sunshine Productions देखील आहे आणि फॅशन व शाश्वततेवर आधारित स्टार्टअप्समध्ये इतर गुंतवणुकीही आहेत. प्रॉडक्शन हाऊसेस आणि स्पोर्ट्स टीम्सपासून ते अनेक ब्रँड्स आणि गुंतवणुकीपर्यंत हे बॉलिवूड स्टार्स सिद्ध करत आहेत की आजच्या सर्वात मोठ्या कलाकारापैकी असून अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःची वेगळी ओळख संपादन केली आहे.

follow us