कतरिना कैफ- विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज

कतरिना कैफ- विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज

Merry Christmas Title Song Release: ‘टायगर 3’ च्या शानदार यशाचा आनंद लुटणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान निर्मात्यांनी ‘मेरी ख्रिसमस’चा टायटल ट्रॅक (Merry Christmas Title Song ) रिलीज केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TIPS (@tips)


‘मेरी ख्रिसमस’चे पहिले गाणे रिलीज

‘मेरी ख्रिसमस’ या गाण्याची ऑडिओ क्लिप रिलीज झाली आहे. निर्मात्यांनी कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या फोटोंसह ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. हे शेअर करताना टिप्सने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लिहिले की, “परिपूर्ण #MerryChristmas गाणे 12 जानेवारीला थिएटरमध्ये….” मेरी ख्रिसमस’चा नवीनतम रिलीज झालेला टायटल ट्रॅक अॅश किंगने गायला आहे आणि त्याचे संगीत प्रीतमने दिले आहे. हे गाणे चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

‘मेरी ख्रिसमस’चे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी बदलापूर आणि अंधाधुन सारखे हिट चित्रपट केले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपटात विजय आणि कतरिनाच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

Ayodhya Ram Mandir च्या उद्घाटन सोहळ्याचं खास निमंत्रण; कोण-कोणते बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी?

‘मेरी ख्रिसमस’ कधी रिलीज होणार?

‘मेरी ख्रिसमस’ वेगवेगळ्या सहाय्यक कलाकारांसोबत दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी तमिळ आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मेरी ख्रिसमस’ 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube