Jitendra Awhad : ‘मग, देशातील 77 टक्के लोक शेण खातात का?’ आव्हाडांचा फडणवीसांना सवाल

Jitendra Awhad : ‘मग, देशातील 77 टक्के लोक शेण खातात का?’ आव्हाडांचा फडणवीसांना सवाल

Jitendra Awhad replies Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी आव्हाड यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आव्हाड शेणही खात असतील असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट लिहित फडणवीसांना उत्तर दिले आहे.

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना माझ्यावर टीका करत असताना म्हटले की, ते काय शेणही खात असतील! मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटले होते, की मी मटण खातो, मटण खातो, म्हणजेच मांसाहार करतो. महाराष्ट्रातीलच नव्हे देशभरातील सुमारे 77 टक्के लोक मांसाहारी आहेत. मग, मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो. असे जर आपले म्हणणे असेल तर देशातील 77 टक्के लोक शेण खातात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच, बहुजन समाज शेण खातो, असे आपले म्हणणे असेल तर आश्चर्यच आहे. हो, नाहीतरी आता नवीन सुरू झाले आहे की मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात.. वगैरे वगैरे. शाकाहार उच्च.. मांसाहार.. नीच’ अशा शब्दांत आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले.

Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, याआधी जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील एका शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. श्रीराम मांसाहार करायचे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. ऐन श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या तोंडावर त्यांनी वक्तव्य केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. वाद वाढत असल्याचे पाहून नंतर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज