जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखा दिसतो, याचे बाप-दादा….; संजय गायकवाडांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखा दिसतो, याचे बाप-दादा….; संजय गायकवाडांचे टीकास्त्र

Sanjay Gaikwad :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल (Lord Sri Ram) मोठं विधान केलं होतं. राम हा मांसाहारी होता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात आव्हाडांचा प्रखर विरोध करण्यात आला. आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी झाली होती. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आव्हाडांवर टीकास्त्र डागलं. जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखा दिसतो, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेची मदत घेतल्यानंतरच मुरली देवरांचेही राजकारण ‘सेट’ झाले होते… 

आज एका कार्यक्रमात बोलतांना गायकवाडांनी आव्हाडांवर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, जिंतेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारख दिसतो. प्रभु राम हे मांसाहारी होते असं आव्हाड सांगतो. याचे बाप-दादा शिवजवून रामाला खाऊ घालत होते का? दहा हजार वर्षापूर्वीचा प्रभू श्रीरामाचा इतिहास आव्हाडला कुठून माहिती पडला? जंगलामध्ये मध्ये राहणार, कंद मुळं खाणारा प्रभू श्रीराम आदर्श राजा होते. आई-वडिलांच्या शब्दावर त्यांनी वनवास भोगाला. अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाला नाव ठेवण्याचं काम आजवर या लोकांनी केलं. आता हा शिवरायांचा मावळा आणि वानरसेनेचा सैनिक आव्हाडांना जागा दाखवल्याशिवाय, राहणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला.

महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांचा शिलेदारच गायब; आ. लंकेंच्या मनात तरी काय? 

आव्हाड नेमकं काय म्हणाले?
येत्या २२ ताऱखेला अयोध्यच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेजण या दिवसााची आतुरतनेते वाट पाहतो आहेत. अशातच शिर्डीतील शरद पवार गटाच्या शिबीरात बोलतांना आव्हाडांची जीभ घसरली होती. राम आपला आहे. तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत असे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाले आहात. पण आम्ही रामाला आपला आदर्श मानतो आणि मांसाहार खातो. 14 वर्षांपासून वनवासात असलेल्या व्यक्तीला शाकाहारी जेवण कोठून मिळेल, असं आव्हाड म्हणाले होते.


यानंतर त्यांनी आपण केलेल्या वक्तव्याचा आपल्याला खेद असल्याचं म्हटलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube