‘जित्या तुझ्या घरी आलो…’ जितेंद्र आव्हाडांना अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी, तक्रार दाखल

Jitendra Awhad threatened जितेंद्र आव्हाड यांना देखील अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी देणारे कल आणि मेसेज आल्याची माहिती

Jitendra Awhad Threatened

Jitendra Awhad threatened with death in abusive language complaint filed : मुंबईतील जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात (Mumbai) अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी देणारे कल आणि मेसेज आल्याची माहिती स्वत: जितेंद्र आव्हाडांना दिली आहे.

‘सूर्या : अंत से आरंभ तक’ दमदार टीझर प्रदर्शित; वैद्यकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसणार सनी देओल!

रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने आव्हाड यांच्याशी संपर्क साधत त्यांना धमकावल्याची माहिती आहे. या प्रकरणी आव्हाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, संबंधित व्यक्तीने पाठवलेला व्हॉट्सॲप संदेशही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक मोबाईल क्रमांक शेअर करत आपल्याला आलेल्या धमकीची माहिती दिली. संबंधित व्यक्तीने दोन ते तीन वेळा फोन करून अर्वाच्य भाषेत बोलत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून हा प्रकार सुरू झाल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले.

फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण आव्हाड यांच्या घराच्या दरवाजाबाहेर उभे असल्याचा दावा केल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले. या प्रकारामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, आव्हाड यांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

आव्हाड यांच्या कार्यकर्त्यालाही धमकी

आव्हाड यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, फोनवरील व्यक्तीने त्यांनाही धमकावल्याचा आरोप आहे.

‘आधी जित्याला गोळ्या घालेन, त्यानंतर तुलाही गोळ्या घालेन,’ अशा शब्दांत संबंधित व्यक्तीने धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. आपण आव्हाड यांच्या घराबाहेर जाऊन आल्याचेही त्या व्यक्तीने म्हटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हेमंत वाणी यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

धमकीमागचे कारण अद्याप अस्पष्ट

जितेंद्र आव्हाड हे विद्यमान आमदार असून, पुरोगामी विचारसरणीच्या राजकारणासाठी ते ओळखले जातात. यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा धमकीचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, यावेळी धमकी देण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणात अद्याप कोणाला ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध नाही.

follow us