मोठी बातमी! अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी जनहित याचिका; मागणी काय?

मोठी बातमी! अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी जनहित याचिका; मागणी काय?

Badlapur Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde Encounter Case) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी (SIT Investigation) करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची जोपर्यंत एसआटी चौकशी केली जात नाही तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न; ‘वंचित’च्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला संशय

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

याआधीच्या सुनावणीवेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिल्याचे सांगितले. त्यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. यावेळी अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अती रक्तस्त्राव झाला, असे त्याच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, बदलापुरातील घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आक्रोश करीत आरोपीला तत्काळा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आंदोलकांच्या मनधरण्या केल्या मात्र, सायंकाळच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं होतं. पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगवलं तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसून आलं होतं.

एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार का?, बदलापूर एन्काउंटरवर फडणवीसांचं रोखठोक मत

या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली होती. प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. अक्षय शिंदेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले, पुढील सुनावण्यांनतर त्याला फाशी होणार अशी अपेक्षा नागरिकांना असतानाच मागील आठवड्यात सोमवारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube