Aap : काँग्रेसचा बदला घेण्यासाठी ‘इंडिया’शी गद्दारी; स्वाती मालीवालने आपच्या जखमेवर मीठ चोळलं
Swati Maliwal : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यादरम्यान हरियानामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपने येथे बहुमताचा आकडा ओलांडला आहे.(Swati Maliwal) आतापर्यंत येथे पाच राऊंडच्या मतांचीच मोजणी झाली आहे. यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व महासचिवांची बैठक बोलवली आहे. यादरम्यान हरियाणात किंगमेकर बनन्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या आपला मात्र खातेही उघडता आलेले नाही.
दरम्यान, हरियाना विधानसभा निवडणुकीत एकूण ८९ जागांवर निवडणुक लढवलेल्या आम आदमी पक्षाला २ टक्क्यांहून देखील कमी मतं मिळाल्याचं दिसत आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर आपच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता स्वतःच्या गृहराज्यात त्यांना डिपॉझीट देखील वाचवता येत नसल्याचा टोला लगावला आहे.
Election Result LIVE : हरियाणात उलटफेर, भाजपाची मुसंडी; जम्मूत भाजपचा पहिला विजय
स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते खाल्ली आहेत. त्या म्हणाल्या की, फक्त काँग्रेसचा बदला घेण्यासाठी हरियानाच्या मैदानात उतरले. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचे खोटे आरोप केले, आज स्वतः इंडिया आघाडीसोबत गद्दारी करत काँग्रेसची मतं खात आहेत. सगळं सोडा, विनेश फोगाटलादेखील हरवण्यासाठी उमेदवार दिला. अशी परिस्थिती का झाली. की स्वतःच्या गृहराज्यात डिपॉझीट देखील वाचवू शकत नाहीयेत? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यावरून पडदा दूर करा, ड्रामा करू नका आणि लोकांसाठी काम करा.
सिर्फ़ कांग्रेस से बदला लेने के लिए हरियाणा में उतरे। मुझपे BJP एजेंट होने के झूठे आरोप लगाए, ख़ुद आज INDIA अलायन्स से ग़द्दारी करके INC की वोट काट रहे हैं!
सब छोड़ो, विनेश फोगाट तक को हराने के लिए प्रत्याशी उतारा।
क्यों ऐसा हाल आ गया है कि अपने गृह राज्य में ज़मानतें नहीं बचा…
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 8, 2024