जेपी नड्डांनी घेतली पीयूष गोयल यांची जागा, भाजपने सोपवली सभागृह नेतेपदाची जबाबदारी
JP Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोदी सरकार 3.0 (Modi Government 3.0) मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना सरकारमध्ये आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आणखी एक मोठी जबाबदारी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपने आज जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केलं.
अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘कल्की 2898 एडी’ची हवा टाइट; रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई
नड्डा यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी येण्यापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी होती. मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गोयल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ही जबाबदारी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभागृह नेते असल्याने पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब संसदेच्या कामकाजाचे अध्यक्षस्थानी होते.
शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी
सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता
10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या NEET परीक्षेतील गैरप्रकार, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमितता या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोध आहेत.
भाजप नवीन अध्यक्षाच्या शोधात
जेपी नड्डा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर भाजपला आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध घ्यावा लागणार आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची भाजपची परंपरा आहे. भाजपच्या घटनेच्या कलम 19 नुसार, पक्षाध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. .