शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी

शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी

Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना लुटण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका करत पटोलेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली.

गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही?, नाना पटोलेंचा सरकारला थेट सवाल 

नाना पटोलेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, देशातील विविध राज्यात दूधाला ४५ रुपये भाव आहे. पण महाराष्ट्रात २७ रुपये आहे. आणि ग्राहकांना तेच दूध ४५ रुपये दराने विकलं जातं. शेतकऱ्याला लुटण्याच काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांची ही लूट तातडीने थांबवून दुधाचे भाव वाढवून दिला पाहिजेत. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पटोलेंनी दिला. तेलंगणाच्या सरकारने जशी शेतकऱ्याची कर्जमाफी केली, तशीच कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी, अशी मागणीही पटोलेंनी केली.

‘बिद्री’च्या कारवाईवरून हसन मुश्रीफ यांचा भाजपला घरचा आहेर; कसल्या कारवाया करता? म्हणत मंत्र्यांवर संतापले 

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर देशभरात खळबळ माजली आहे. परीक्षेतील पेपर फूट प्रकरणात विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पटोले म्हणाले, नीटच्या PG च्या परीक्षा सरकारने जाहीर केल्या. आणि ऐन वेळी केंद्र सरकारने PG ची परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकार करण्याचे पाप हे एनडीएचे सरकार करत आहेत, अशी टीका पटोलेंनी केली.

पटोले म्हणाले, मी सरकारला पणोती नाही म्हणणार. पण या सरकारमध्येच हे का घडत आहे? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. राज्य करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार सक्षम राहीलं नाही. पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube