‘बिद्री’च्या कारवाईवरून भाजपला हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर; कसल्या कारवाया करता? म्हणत मंत्र्यांवर संतापले

‘बिद्री’च्या कारवाईवरून भाजपला हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर; कसल्या कारवाया करता? म्हणत मंत्र्यांवर संतापले

Hasan Musrif News : माजी आमदार के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर जात असल्यानेच ईडीकडून कारवाई केली जात असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कारवाई प्रकरणी निषेध व्यक्त केलायं.

आधी सत्कार नंतर थेट काळे फासत विचारला जाब; जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणं तारख यांना भोवलं

हसन मुश्रीफ म्हणाले, के. पी. पाटील हे महाविकास आघाडीत जात असल्यानेच कारवाई केली जात आहे. के. पी. पाटील यांच्या घरावर ईडी, सीबीआयने छापा टाकल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचा खडेबोल सुनावले आहेत.

मोठी बातमी! नीट परीक्षेत पेपर फुटल्याचं उघड; आरोपींकडं सापडलेल्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ६८ प्रश्न सारखेच

65 हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणे हे मला आवडलेले नाही. मी याचा तीव्र शब्दांत निषेध करीत अशून हा कारखाना पाटील यांच्या मालकीचा नसून 65 हजार सभासदांच्या मालकीचा असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारचं राजकारण करून कोणी यशस्वी होणार नाही. एखाद्याला रोखायचे असेल तर त्याची पाठ टिकवणे हाच उपाय रहातो. त्यामुळें या कारवाईचा के पी पाटलांनाच जास्त फायदा मिळेल असे मला वाटत, असल्याचंही मुश्रीफ म्हणाले आहेत.

तसेच बिद्री साखर कारखाना हा सभासदांचा आणि सहकारी साखर कारखाना आहे, अस असताना अशाप्रकारे वागणूक बरी नाही. बिद्री साखर कारखाना कारवाई प्रश्नी मी संबंधित मंत्र्यांशी बोलेन, कारवाई करायची असेल तर व्यक्तिगत कारवाई करा, पण कारखान्यावर कारवाई उत्पादन शुल्क विभागाने ज्या पद्धतीने बिद्री साखर कारखान्यावर कारवाई केली, तिथे संशयाला जागा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्यात सामाजिक सलोखा बिघडविणे वाईट
आम्ही शासनात सहभागी झाल्यापासून तिन्ही पक्षाची एकच भूमिका राहिला आहे. सर्व समाजाला आरक्षण मिळावे. एका समाजाचा आरक्षण काढून घेऊन दुसऱ्या समाजाला आरक्षण न देता त्याला नवीन आरक्षण कसे देता येईल याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज्यात सामाजिक सलोखा बिघडणे हे अतिशय वाईट आहे. सर्व समाज घटकाचा समाधान करण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube