मोठी बातमी! नीट परीक्षेत पेपर फुटल्याचं उघड; आरोपींकडं सापडलेल्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ६८ प्रश्न सारखेच

मोठी बातमी! नीट परीक्षेत पेपर फुटल्याचं उघड; आरोपींकडं सापडलेल्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ६८ प्रश्न सारखेच

Neet Exam Scam : देशभरात आक्रोश निर्माण करणाऱ्या नीट पेपट लीक प्रकणात रोज नवे-नवे खुलासे समोर येत आहेत. बिहार सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘नीट-यूजी’ परीक्षेत अनियमिततांची चौकशी केली. (Neet) त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. (Neet Exam) त्या अहवालामध्ये ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असल्याचं अहवालात नमूद करण्याची माहिती आता उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जळालेल्या छायाप्रतींमध्ये जवळपास ६८ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत आहेत असं आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पाच दिवसांपूर्वी या प्रश्नपत्रिका (EOU)ला पाठवल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

एकूण संख्या १८ वर राष्ट्रपतींनी 18 व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांची केली नियुक्ती, कोण आहेत भर्तृहरी महताब?, वाचा सविस्तर

शिक्षण मंत्रालयाला प्राप्त झालेल्या (EOU)च्या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून जे जळालेले पेपर सापडले होते, त्यावर काही शाळांचे युनिक परीक्षा केंद्रांचे नंबरही होते. (EOU)ने मूळ कागद आणि त्यातील प्रश्नांशी जळलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळवाजुळव करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली. अहवालाच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. (EOU)ने रविवारी आणखी पाच संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, पेपर लीक प्रकरणाशी संबंधित पकडलेल्यांची एकूण संख्या १८ वर पोहोचली आहे.

६८ प्रश्नांचे अनुक्रमांक सारखे

महत्त्वाचं म्हणजे, मूळ प्रश्नपत्रिका आणि जळालेल्या प्रश्नपत्रिकेत ६८ प्रश्न सारखेच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रश्नांचे अनुक्रमांकही एकसारखेच आहेत. जळालेले हे पेपर परीक्षेच्याच दिवशी म्हणजेच ५ मे रोजीच सापडले होते. परंतु, EOU ने हे पेपर तपासून पाहण्यास उशीर केला. तसंच, एनटीएच्या अनिच्छेमुळे ही प्रश्नपत्रिका राज्य सरकारकडे पाठवण्यासही विलंब झाला.

लिफाफा चुकीचा फाडला आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन; नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार,;नीट;चा मुद्दा संसदेत गाजणार?

सध्या बिहार EOU पेपर फुटण्याची वेळ आणि ठिकाण ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया एनटीएने ईओयूला सांगितली आहे. ज्यामुळे पेपर कसा आणि कुठून फुटला याबाबतची माहिती मिळू शकेल. सूत्रांनी सांगितले की, पथकाने शाळेला भेट देऊन प्रश्नपत्रिका आलेले सर्व लिफाफे आणि खोके तपासले असता, एक लिफाफा वेगळ्या टोकाला उघडल्याचं निदर्शनास आलं. प्रश्नपत्रिका आणारे सर्व लिफाफे नेहमी विशिष्ट पद्धतीने फाडले जातात. यासाठी शिक्षकांना विशेष ट्रेनिंगही दिली जाते. परंतु, एक लिफाफा, चुकीच्या पद्धतीने फाडण्यात आला होता.

पोलिसांसमोर साक्ष दिली

EOU ने अटक केलेल्या लोकांची डिजिटल उपकरणे आणि फोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आरोपींनी त्यांची उपकरणे फॉरमॅट केल्याचं उघड झालं आहे. सर्व आरोपींनी पोलिसांसमोर साक्ष दिली आहे की अटक केलेल्यांपैकी चार परीक्षार्थींनी ५ मे रोजी NEET-UG परीक्षेच्या एक दिवस आधी लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे राजबंशी नगर येथील एका ठिकाणी राहून पाठांतर केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज