NEET UG Exam ची सुनावणी एका आठवड्यासाठी टळली; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
NEET UG Exam Pleas Adjourns by Supreme Court : देशभरात वादग्रस्त ठरलेल्या मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी 2024 (NEET UG Exam) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आज सुनावणी पार पडणार होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली (Pleas Adjourns) आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरूवारी 18 जुलैला होणार आहे. असं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..
या प्रकरणाची आज 11 जुलै रोजी होणार होती. नीट यूजी 2024 मध्ये पेपर लीक झाल्याच्या प्रकरणावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आयटम नंबर 40 ते 45 दरम्यान लिस्ट करण्यात आले होते. मात्र आज आयटम नंबर 32 ची सुनावणी पार पाडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरूवारी 18 जुलैला होणार आहे.
BREAKING| Supreme Court Adjourns Pleas To Cancel NEET-UG 24; Next Posting On July 18 |@DebbyJain #SupremeCourt #NEETUG #NEETUGUPDATE https://t.co/88rbty1eNr
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2024
NEET पेपरफुटी झालीच नाही…
दरम्यान गेल्या सुनावणीमध्ये मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी 2024 बाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आज (11 जुलै) केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये केंद्राने नीट परिक्षेमध्ये कोणतीही पेपरफुटी झालीच नाही असा मोठा दावा केला आहे. केंद्राने म्हटले की, नीट परिक्षेमध्ये कोणतीही पेपरफुटी झालीच नाही. विद्यार्थ्यांच्या गुणांमधील तफावत अभ्यासक्रम कमी केल्यामुळे 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला म्हणून मार्क वाढले आहेत.
विरोधकमुक्त सिक्कीम! एकमेव विरोधी आमदाराचा सत्ताधारी पक्षात प्रवेश
तसेच या पेपरफुटी संदर्भात IIT मद्रासची मदत घेण्यात आली आहे. तसेच NTA ने स्पष्ट केले की, टेलिग्रामद्वारे पेपरफुटी संदर्भात केलेला दावा फेक आहे. यासाठी जुलैच्या तिस-या आठवड्यात चार राऊंडमध्ये कॉन्सिलिंग होणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात दिली आहे.