मोठी बातमी : कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला SC कडून जामीन
पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या भीषण पोर्श कार अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला SC कडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Pune Porsche Crash Supreme Court Grants Bail To Vishal Agarwal : पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या भीषण पोर्श कार अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला SC कडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. १९ मे २०२४ रोजी पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात पोर्श कार चालवल्याचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अपघातानंतर विशाल अग्रवालवर गाडीतील व्यक्तींचे रक्ताचे नमुने बदल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. साधारण घटनेपासून 22 महिने विशाल अग्रवाल जेलमध्ये होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाकडून अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे
#BREAKING Pune Porsche Crash | Supreme Court Grants Bail To Father Of Minor Driver In Blood Sample Swapping Case |@AmishaShriv #SupremeCourt https://t.co/gCfhcIvmpZ
— Live Law (@LiveLawIndia) March 10, 2026
कधी घडला अपघात
19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिली होती. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) यांचा या अपघातात जागीच मृत्यृ झाला होता. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा तरूण हा 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती, कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.
अपघातानंतर काय घडलं?
सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रकरण गंभीर झाले. सुरुवातीला, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) अवघ्या 14 तासांत आरोपीला 100 शब्दांचा निबंध, ‘समाजसेवा’ आणि ‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे’ अशा अटी घालून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर प्रकरण जोरदार चर्चेत आलं होतं.
अलिशान गाड्यांचे शौकीन विशाल अग्रवाल कोण?
विशाल अग्रवाल हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. ब्रम्हा कॉर्प हा त्यांचा बांधकाम उद्योग समुह आहे. याचे ते प्रमुख आहेत. गेल्या 40 वर्षांपासून हा समुह पुण्यामध्ये बांधकाम व्यवसायात आघाडीवर आहे. ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी हा उद्योग समुह स्थापन केला असून त्यामध्ये अनेक कंपन्या आहेत. तर पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात या समुहाचे मोठे गृहप्रकल्प आहेत. त्याचबरोबर पुण्यातील मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब यांची बांधकामं देखील या कंपनीकडून केली गेली आहेत. ब्रम्हकोर्प उद्योग समूहातील ब्रम्हा मल्टीस्पेस आणि ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रम्हदत्त अग्रवाल यांच्याकडून त्यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर आता सुरेंद्र यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली आहे.
तर विशाल अग्रवाल यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांना आलिशान गाड्यांचा प्रचंड शौक आहे. यातीलच एक गाडी म्हणजे कोट्यावधींची किंमत असलेली पोर्शे. याच कारने अग्रवाल यांच्या मुलाने दोघांचा जीव घेतला. तर या अगोदर देखील अग्रवाल यांच्या मोठ्या मुलाने अशाच प्रकारे आलिशान गाडी वेगाने चालवून रस्त्यावरील वाहनांसह विजेच्या खांबाचे नुकसान केलं होतं. मात्र त्या प्रकरणाची चर्चा झाली नव्हती.
