विरोधकमुक्त सिक्कीम! एकमेव विरोधी आमदाराचा सत्ताधारी पक्षात प्रवेश

विरोधकमुक्त सिक्कीम! एकमेव विरोधी आमदाराचा सत्ताधारी पक्षात प्रवेश

Sikkim Politics : मागील दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला देश काँग्रेसमुक्त करता आला नाही. पण, भारतातीलच सिक्कीम (Sikkim Politics) या राज्यात विरोधकच राहिलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने 32 पैकी 31 जागा जिंकत विरोधी पक्षांचा सुपडा साफ केला होता. फक्त एकच आमदार सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या विरोधी पक्षाचा निवडून आला होता. आता मात्र या आमदारानेही पलटी मारत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.  अशा पद्धतीने राज्यात आता निदान पाच वर्षे तरी विरोधक राहिलेले नाहीत.

सिक्कीम राज्यात आता विरोधक राहिले नाहीत. बुधवारी विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या एकमेव आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा मध्ये प्रवेश घेतला. आमदार तेनजिंग नोरबू लामथा यांनी सिक्कीम क्रांतिकारी पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सोशल मीडियावर दिली. 19 एप्रिल रोजी सिक्कीम मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. 2 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 32 पैकी तब्बल 31 जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला.

Sikkim Elections : ना घर, ना जमीन.. प्रचारासाठी स्कूटर अन् माईक; ‘गरीब’ उमेदवार देतोय मंत्र्याला टक्कर

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला फक्त एक जागा जिंकता आली. यानंतर या विरोधी पक्षातील एकमेव आमदाराने सुद्धा पक्ष सोडत सत्ताधारी गटात प्रवेश केला आहे. यानंतर सीएम तमांग यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. यात ते म्हणतात की मला आज आमदार तेनजिंग लामथा यांच्याशी भेटून आनंद होत आहे. आता ते अधिकृतपणे आमच्या एसकेएम परिवारात सहभागी झाले आहेत. तर नोरबू म्हणाले आधी मी एसकेएम मध्येच होतो आता मी पुन्हा घरवापसी केली आहे.

मी विरोधी पक्षात होतो तेव्हा विचार केला की आपल्या भागाचा विकास करण्यासाठी काय केले पाहिजे. यानंतर मी माझ्या सियारी मतदारसंघातील लोकांशी चर्चा केली. आता त्यांच्याच इच्छेने मी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सियारीचा विकास हेच माझे पहिले प्राधान्य आहे, असेही नोरबू यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयानंतर आता सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी पक्षाचेच राज्य राहणार आहे. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षच नाहीत.

अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये आज मतमोजणी; वाचा, कोणता पक्ष आहे आघाडीवर?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube