अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये आज मतमोजणी; वाचा, कोणता पक्ष आहे आघाडीवर?

अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये आज मतमोजणी; वाचा, कोणता पक्ष आहे आघाडीवर?

Today Arunachal Pradesh and Sikkim Assembly Counting votes : लोकसभा निवडणुकीचा शेटवटा टप्पा पार पडताच सर्वांचं लक्ष लागलय ते 4 जूनकडे. काय होत आणि कोण मारतो बाजी. दरम्यान, आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम विधानसभेसाठी मतमोजणी सकाळपासूनच सुरू झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील 50 आणि सिक्किम विधानसभेच्या 32 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. अरुणाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपने 60 सदस्यांच्या विधानसभेत यापूर्वीच दहा जगांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.

सिक्कीम विधानसभेत 32 जागा आहेत. सत्ताधारी सिक्किम क्रांतिकारी मोर्चाला सलग दुसऱ्यांदा विजयाची अपेक्षा आहे. विरोधी पक्ष असलेला एसडीएफ त्यांना सत्तेवरुन खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे. सध्यातरी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अरुणाचल प्रदेशात भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे. सिक्कीममध्ये भाजप एका जागेवर तर सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा चार जागांवर आघाडीवर आहे.

2019 ला काय होती स्थिती

अरुणाचलमध्ये भाजपने 2019 मध्ये 42 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. त्याच वेळी, सिक्कीममधील 32 जागांपैकी सिक्कीम क्रांती पार्टी 17 जागांवर विजय मिळवला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. सिक्कीममध्ये एकूण 79.88 टक्के मतदान झालं. तर, अरुणाचल प्रदेशमध्ये 82.95 टक्के मतदान झालं आहे. सध्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 24 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी 2000 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

एक्झिट पोल काय?

अनेक जागांवरून ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला 44 ते 51 जागा मिळू शकतात. तर एनपीपीला 2 ते 6 जागा आणि काँग्रेसला फक्त एक ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना दोन ते सहा जागा मिळू शकतात. असा हा एक्झिट पोल आहे. मात्र, हा एक्झिट पोल काहीही असला तरी दोन्ही बाजूने आपला विजय होईल असा दावा मात्र सर्वच राजकीय पक्ष करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज