राष्ट्रपतींनी 18 व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांची केली नियुक्ती, कोण आहेत भर्तृहरी महताब?, वाचा सविस्तर
Bhartruhari Mahtab Pro Tem Speaker 18th lok Sabha : एनडीए सरकारच्या पहिल्या संसद अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. (Neet) नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. तत्पुर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. (Lok Sabha Session) या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
कोण आहेत भर्तृहरी महताब
भर्तृहरी महताब यांचा जन्म 8 सप्टेंबर 1957 रोजी ओडिशातील अगपदा जिल्ह्यातील भद्रक येथे झाला आहे. ते ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. हरेकृष्ण महताब यांचे पुत्र आहेत. राजकारणासोबतच ते लेखक असून सामाजिक कार्यातही योगदान देतात. त्यांनी उत्कल विद्यापीठाच्या रावेनशॉस कॉलेजमधून 1978 साली पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1998 मध्ये बीजेडीच्या तिकिटावर त्यांनी पहिल्यांदा कटक लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
सलग सातवेळा विजय लोकसभा स्पीकर पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट; इंडियाच्या त्या& ऑफरने वाढली भाजपाची धाकधूक
भर्तृहरी महताब हे ओडिशाच्या कटक मतदारसंघातून सातवेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. याच वर्षी ओडिशात बिजू जनता दलला (बीजेडी) मोठा धक्का देत, भर्तृहरी महताब यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. महताब यांना संसदेच्या चर्चेतील प्रशंसनीय कामगिरीबद्दल 2017 पासून सलग चार वर्षे ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर त्यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 आणि आता भाजपकडून 2024 मध्ये सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे.
नुकताच भाजप प्रवेश आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन; नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार, ‘नीट’चा मुद्दा संसदेत गाजणार?
प्रादेशिक पक्षाच्या अलीकडच्या कारभारावर नाराजी असल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. 1998 पासून बीजेडीच्या तिकिटावर कटकमधून सहा वेळा ते खासदार म्हणून विजयी झालेले आहेत. यावेळी त्यांनी बीजेडीचे संतरूप मिश्रा यांचा 57 हजार 77 मतांनी पराभव केला. त्यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून ते 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत अध्यक्ष असणार आहेत.