VIDEO: जय भीम, जय पॅलेस्टाइन…शपथ घेतल्यानंतर ओवैसींची सभागृहातच घोषणा; भाजपकडून विरोध

  • Written By: Published:
VIDEO: जय भीम, जय पॅलेस्टाइन…शपथ घेतल्यानंतर ओवैसींची सभागृहातच घोषणा; भाजपकडून विरोध

Asaduddin Owaisi Says Jai Palestine: लोकसभेच्या विशेष अधिवेशनात (Lok Sabha Session) नवनिर्विचित खासदार हे शपथ घेत आहेत. एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या शपथेमुळे मात्र नवीन वाद निर्माण झाला आहे. ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यानंतर जय भीम, जय तेलंगणा आणि त्यानंतर जय पॅलेस्टाइन (Palestine) अशी घोषणा त्यांनी दिली. या घोषणेनंतर भाजपचे खासदार चिडले. (Jai Bhim, Jai Palestine…Owaisi announced in the House after taking oath; Opposition from BJP)

नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं जप्त, दोन जण ताब्यात

प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवैसीं यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलविले आहे. ओवेसी यांनी उर्दुमध्ये शपथ घेतली. पण शपथ घेण्यासाठी ते बिस्मिल्लाह म्हटले. त्यानंतर शपथ घेतली. त्यानंतर जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाइन अशी घोषणा त्यांनी दिली. त्यानंतर अल्ला हू अकबरही ते म्हणाले.



वाद वाढला! राजनाथ सिंहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर; म्हणाले, मी खर्गेंबरोबर..

ओवैसी यांच्या जय पॅलेस्टाइनच्या घोषणाला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावर केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत जय पॅलेस्टाइनची घोषणा दिली आहे. ते एकदम चुकीचे आहे. सभागृहाच्या विरोधात हे आहे. भारतात रहून भारत माता की जय सभागृहात म्हणून शकत आहे. हे त्यांना समजले पाहिजे. देशात राहून ते असंवैधानिक काम करत आहेत.

ओवैसी हे हैद्राबादमधून पाचव्यांदा खासदार
AIMIM प्रमुख अससुद्दीन ओवैसी हे हैद्राबाद शहरातून पाचव्यांदा लोकसभेत निवडून आलेत.त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. ओवेसी हे हे पहिल्यांदा 2004 लोकसभेवर निवडून आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube