राज्यात MIM ला मोठं यश; 120 हून अधिक उमेदवारांनी मारली बाजी
Maharashtra Municipal Corporations Rulest : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत एमआयएमने 120 पेक्षा
Maharashtra Municipal Corporations Result : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत एमआयएमने 120 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 13 महापालिकेत एमआयएमचे उमेदवार विजय झाले आहे. मुंबई, अहिल्यानगर, छ.संभाजीनगरसह अनेक ठिकाणी एमआयएमचे उमेदवार जिंकून आले असल्याने राज्यातील राजकारणात एमआयएमने शानदार एन्ट्री केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एमआयएमने छ. संभाजीनगर महापालिकेत सर्वाधिक 33 जागा जिंकले असून मालेगावात 21 तर नांदेडमध्ये 14 अमरावतीमध्ये 11, नागपूरमध्ये 7, जालन्यात 2, धुळे येथे 10, गोवंडी येथे 5, म्रुंबा येथे 6, अकोला येथे 3, अहिल्यानगर येथे 2 आणि परभणीत 1 जागा जिंकल्या असून काही महापालिकेत उमेदवार आघाडीवर असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत महायुतीसह अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे एमआयएमचे आमदार अकबरुदुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी देखील मालेगाव, मुंबईसह छ. संभाजीनगर येथे जाहीर सभा घेत एमआयएमला (MIM) मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर दुसरीकडे एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर तिकीट वाटपावरुन अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच छ. संभाजीनगर येथे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्यानंतर महापालिका निवडणुकीत एमआयएम कशी कामगिरी करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते मात्र या निवडणुकीत एमआयएमने शानदार कामगिरी करत 120 पेक्षा जास्त उमेदवार जिंकून आणल्याने आता एमआयएम महापालिका निवडणुकीत पाचवा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
मुंबईत नवीन ट्विस्ट, काँग्रेस ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत तर ठाकरे बंधूंचा कमबॅक-
120 पेक्षा जास्त उमेदवार जिंकून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जितकं यश एमआयएमला मिळालं नव्हतं, त्या पेक्षा जास्त मोठं यश एमआयएमला मिळालेलं असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्याकडून देण्यात आली आहे.
विजयी उमेदवारांची आकडेवारी
संभाजीनगर -33
मालेगाव -21
नागपूर -7
जालना -2
धुळे -10
नांदेड -14
गोवंडी -5
मुंब्रा -6
अकोला -3
अमरावती -11
अहिल्यानगर – 2
परभणी -1
