एमआयएमशिवाय नगरचा महापौर होणार नाही, असदुद्दीन ओवैसींचा थेट दावा

Asaduddin Owaisi : मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं

  • Written By: Published:
Asaduddin Owaisi Ahilyanagar Mahapalika Election

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील (Ahilyanagar Mahapalika Election) मुकुंदनगर भागात एमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची (Asaduddin Owaisi) जोरदार सभा झाली. या सभेत त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर एकाचवेळी जोरदार हल्ला चढवला. कोल्हापूरमध्ये एमआयएमच्या उमेदवार एम. जे. सय्यद यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धमकी व दहशत करण्यात आली,असा गंभीर आरोप करत ओवैसी म्हणाले,काँग्रेसवर टीका करताना त्यांनी थेट आव्हान दिलं काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून दाखवा. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांपासून दूर रहा. पैशे वाटपावर त्यांनी उपरोधिक टोला लगावला कोणी पैसे वाटत असेल तर घ्या, पण त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा

महिलांच्या भूमिकेवर ठाम भर देताना ओवैसी म्हणाले,बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएम ला मत देणार. एमआयएमला इथंवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे.

महापौर निवडीसाठी एमआयएम ठरेल किंगमेकर

महापौरपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहता नगरच्या राजकारणात एमआयएम निर्णायक भूमिकेत येताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे नसताना, एमआयएमचे निवडून येणारे नगरसेवकच महापौर कोण होणार हे ठरवणार आहेत. एमआयएमला शिवाय महापौर होणार नाही, असा थेट दावा करत असदुद्दीन ओवैसी यांनी नगरच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका एमआयएम कडेच राहील, असा ठाम संदेश दिला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी सुरू असलेल्या राजकीय गणितात एमआयएम हा निर्णायक घटक ठरून संपूर्ण सत्ता-समीकरणाला नवे वळण देणार, हे स्पष्ट झाले आहे.आमचे सहा उमेदवार मैदानात उतरले आहेत; एमआयएम शिवाय महापौर होणार नाही.

जालीम हरतील; 15 तारखेला निर्भय मतदान करा

मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

मोदी सरकार, वक्फ कायदा व RSS वर थेट टीका

ओवैसींनी आरोप केला की नरेंद्र मोदी सरकारने चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अजित पवार यांच्यासोबत वक्फ कायदा केला असून भाजपा–RSS मशीद, मदरसे बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. हा कायदा गैरकायदा आहे मोदी सरकार जुल्म करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

संविधानावर ठाम भूमिका; द्वेषावर घणाघात

मी ‘हिजाब घातलेली मुलगी पंतप्रधान होऊ शकते’ असं म्हटलं होतं. पाकिस्तानच्या संविधानात एकच समाज लिहिलेला आहे पण डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळे कोणालाही पंतप्रधान होता येतं. याला विरोध करणारा वेडा आहे,असं ठामपणे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री मुस्लिम वस्त्यांत बांगलादेशी म्हणत फिरत असल्याचा आरोप करत, भाजपा–RSS मोबाईलच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत अशी टीका केली.

follow us