BJP-MIM Alliance : मोठी बातमी! अकोटमधील भाजप – MIM युती तुटली
BJP-MIM Alliance : अकोटमधील भाजप आणि एमआयएमची युती तुटली असून या प्रकरणात भाजपच्या दोषी नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार
BJP-MIM Alliance : अकोटमधील भाजप आणि एमआयएमची युती तुटली असून या प्रकरणात भाजपच्या दोषी नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने देखील युतीमधून बाहेर पडण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी विधानसभा आमदार प्रकाश भारसाखळे (Prakash Bharsakhale) यांना कारणे दाखवा नोटीस दाखव कारवाई का करु नये याबाबत खुलासा मागविला आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये आपण अकोट नगरपरिषद मध्ये एमआयएमसोबत युती (BJP-MIM Alliance) करुन पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच असे करीत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा असं पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाखळे यांना पाठवला आहे.
तर दुसरीकडे या युतीसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर देखील कारवाई भाजपकडून (BJP) करण्यात येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर भाजपचे नगरसेवक युतीसाठी दिलेला पत्र मागे घेणार आहे. त्यामुळे एमआयएम (AIMIM) आणि भाजप युती तुटली असून आता अकोटच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नेमकं प्रकरण काय?
नुकतंच झालेल्या अकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकले होते तर एमआयएमने 5 जागांवर बाजी मारली होती मात्र या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने स्थानिक पातळीवर अकोट शहरच्या विकासाठी भाजपकडून अकोट विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये भाजपने एमआयएमसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेलासोबत घेत युतीची स्थापना केली होती मात्र आता ही युती तुटली असून दोन्ही पक्षातील नेत्यांनी या युतीसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवार असो किंवा कोणी सोडणार नाही.. फडणवीसांचा थेट इशारा
