मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवार असो किंवा कोणी सोडणार नाही.. फडणवीसांचा थेट इशारा

 Devendra Fadnavis On Parth Pawar Land Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा

 Devendra Fadnavis On Parth Pawar Land Case

 Devendra Fadnavis On Parth Pawar Land Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील 1804 कोटी भाव असलेली शासकीय 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खेरदी करुन मोठा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.  तर दुसरीकडे या प्रकरणात चौकशीसाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना देखील अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

तर आता या प्रकरणात (Mundhwa Land Scam) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत पार्थ पवार असो किंवा कोणी दुसरा असो या प्रकरणात आम्ही कारवाई करणार असा इशारा दिला आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुढवा जमीन व्यवहार प्रकरणात भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंढवा जमीन व्यवहार हा एक मोठा घोटाळा आहे. सरकारी जमिनीची खरेदी – विक्री सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणात  गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar) यांचे भाऊ दिग्विजय पाटील यांच्यासह या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्थ पवार यांचं नाव एफआयआरमध्ये नाही मात्र या प्रकरणात दाखल होणाऱ्या चार्जशीटमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव असणार त्यांच्यावर कारवाई होणार असं या मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’साठी, आमिर खानला कसे राजी केले, वीर दासने सांगितला किस्सा

या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहे. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीने 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी केली. तसेच या खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

follow us