राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणानंतर भुजबळांबद्दल दादांचा प्लॅन ठरला होता, कोल्हे काय म्हणाले?
या चर्चेवेळी दादांनी ओघाने सांगितलं होतं की कदाचित भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा केली होती.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच् (NCP) एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यावर शरद पवार गटाचे वेगवेगळे दावे करत आहेत. तर अजित पवार गटाकडून असं काही झालं नसल्याचं बोललं जात आहे. आजा शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर येत अनेक गोप्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दलही मोठ विधान केलं आहे.
विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. या आधी भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते, त्यावेळेला सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या. मात्र, एकत्रीकरणानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
असे गैरसमज पसरवणं निश्चितच गंभीर; जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर काय म्हणाले अमोल कोल्हे?
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला वाटतं की छगन भुजबळ हे खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, विशिष्ट जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेंबासारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती.
या चर्चेवेळी दादांनी ओघाने सांगितलं होतं की कदाचित भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती. आता मात्र सामाजिक प्रश्नांची इतकी जाण असणारा नेता राज्यसभेवर न जाता, कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होत असेल, त्यामुळे कदाचित भुजबळ अस्वस्थ असतील, त्याबाबत मला कल्पना नाही असंही भुजबळ म्हणाले आहेत.
