Amarnath Yatra 2026: अमरनाथमधील शिवलिंग पाच दिवसांत वितळले; नेमकं कारण काय ?

Amarnath Yatra 2026: अत्यंत कमी तापमानामुळे हे थेंब गोठतात आणि हळूहळू बर्फाचे थर तयार होत नैसर्गिक शिवलिंगाची निर्मिती होते.

  • Written By: Published:
Amarnath Yatra 2026

Amarnath Yatra 2026: आयुष्यात एकदा तरी अमरनाथ यात्रा करण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यात अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग डोळ्यात भरभरून पाहण्याची इच्छा असते. त्याला बाबा बर्फानी म्हटले जातं. परंतु शिवलिंग हे आता तयार होते. परंतु काहीच दिवसात ते वितळून जात आहे. पूर्वी शिवलिंगचे दर्शन तब्बल 57 दिवस म्हणजे दोन महिने होते. आता ही दिवस कमी होत आहे. ही संख्या 38 दिवस, 28 दिवस, 7 दिवस आणि आता फक्त 5 दिवसांवर आली आहे. पण शिवभक्तांच्या श्रद्धेशी निगडित चिंतेचा विषय बनलाय. पुढील काळात हा आकडा शून्यावर तर जाणार नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झालीय.

अमरनाथची पवित्र गुहा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,888 मीटर उंचीवर हिमालयातील लिद्दर खोऱ्यात आहे. येथे भाविक 48 किलोमीटर लांबीच्या पहलगाम मार्गाने किंवा 14 किलोमीटरच्या तुलनेने कमी पण अतिशय खड्या बालटाल मार्गाने पोहोचतात. येथील बर्फाचे शिवलिंग दरवर्षी हवामान आणि गुहेतील तापमानानुसार तयार होते आणि हळूहळू वितळते.

गुहेत शिवलिंगच दिसलेच नाही
2 जुलै रोजी बर्फाचे शिवलिंग पूर्ण तयार झाले होते. पण 7 जुलैला हजारो भाविक “बम भोले”च्या जयघोषात अमरनाथ गुहेत पोहोचले. मात्र, आत प्रवेश केल्यानंतर सर्वजण स्तब्ध झाले. कारण जिथे बाबा बर्फानींचे हिमलिंग असते, तिथे फक्त ओला दगड दिसत होता. पण नैसर्गिक हिमलिंग पूर्णपणे वितळले होते. त्या वेळी सुमारे 3 लाख भाविक यात्रेच्या मार्गावर होते. अनेकांनी महिन्यांपूर्वी नोंदणी केली होती, तर काहींनी अनेक वर्षांची बचत खर्च करून ही यात्रा गाठली होती. मात्र, यंदा त्यांना अपेक्षित दर्शन लाभले नाही.


बाबा बर्फानींचे हिमलिंग कसे तयार होते?

अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे कोणत्याही व्यक्तीने किंवा यंत्राने तयार केलेले नसते. गुहेच्या छतावरून पाण्याचे थेंब पडतात. अत्यंत कमी तापमानामुळे हे थेंब गोठतात आणि हळूहळू बर्फाचे थर तयार होत नैसर्गिक शिवलिंगाची निर्मिती होते. या हिमलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते चंद्राच्या कलांनुसार आकाराने वाढते आणि कमी होते. पौर्णिमेला ते मोठे असते, तर अमावास्येला लहान होते. त्यामुळे आकारातील बदल नैसर्गिक असला, तरी दरवर्षी इतक्या लवकर वितळणे ही चिंतेची बाब मानली जातेय.

दोन हजार वर्षांचा इतिहास काय सांगतो?
प्राचीन ग्रंथ राजतरंगिणीमध्ये अमरनाथ यात्रेचा उल्लेख आढळतो. तत्कालीन राजे येथे पूजेसाठी येत असत. आईन-ए-अकबरीमध्येही या यात्रेचा उल्लेख आहे. तसेच स्वामी विवेकानंदांनीही अमरनाथचे दर्शन घेतल्याची नोंद आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक राजवटी बदलल्या, पण बाबा बर्फानींचे नैसर्गिक प्रकट होणे कायम राहिले. त्यामुळे आता इतक्या झपाट्याने हिमलिंग वितळण्यामागे नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.


वाढती गर्दी आणि विकासाचा परिणाम?

पूर्वी अमरनाथ यात्रा ही कठोर तपश्चर्या मानली जात होती. आज ती तुलनेने अधिक सुलभ झाली आहे. गुहेजवळपर्यंत लंगर, विविध सुविधा आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास झाल्याने यात्रेकरूंची संख्या प्रचंड वाढली आहे. हिमालयीन प्रदेश इतर पर्वतीय भागांच्या तुलनेत अधिक वेगाने तापमानवाढ होत आहे. गेल्या दोन दशकांत यात्रा मार्गावरील रस्ते रुंद करण्यात आले, तात्पुरत्या निवासव्यवस्थांमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर जड यंत्रसामग्रीचा वापर वाढल्याने येथे प्रदूषण वाढल्याचा आहे परिणाम असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.


आकडे काय सांगतात?

2013 मध्ये यात्रा संपण्यापूर्वीच हिमलिंग वितळले होते. तर 2016 मध्ये केवळ 10 दिवस दर्शन झाले. तर 2018 सुमारे 29 दिवस हिमलिंग दर्शनासाठी होते. 2022 मध्ये फक्त 18 दिवस दर्शन झाले होते. 2024 ला केवळ 7 दिवस दर्शन झाले आणि आता 2026 मध्ये अवघे 5 दिवस हिमलिंग टिकले.


भगवान रागावले आहेत का?

काही जण यामागे भगवान शिवांचा कोप असल्याचे मानतात, तर काहींच्या मते हे हवामान बदलाचे स्पष्ट परिणाम आहेत. सनातन परंपरेनुसार शिव म्हणजेच प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच शिव. त्यामुळे निसर्गाचे नुकसान झाले तर त्याचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही, तर श्रद्धेवरही होतो.


उपाय काय केले पाहिजे?

यात्रेसाठी दरवर्षी मर्यादित संख्येने भाविकांना परवानगी द्यावी. प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी.
गुहेच्या परिसरातील बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवावे. पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

follow us