शहर विद्रुपीकरणामध्ये भाजपच आघाडीवर, ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत पुणे मनपाकडून पुरस्कार जाहीर!
Pune Municipal Corporation Bhau Flex Kadha campaign शहर विद्रुपीकरण या पुरस्काराचे पहिले मानकरणाऱ्यांचे नावं समोर आले आहेत.
BJP leads in defacing city Pune Municipal Corporation announces award of Bhau Flex Kadha campaign : पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात थेट डिजिटल मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेने खास ‘भाऊ फ्लेक्स काढा’ bhauflexkadha.pmc.gov.in नावाचं संकेतस्थळ तयार केलं आहे. या वेबसाईटवर जाऊन नागरिकांना शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो अपलोड करता येणार आहेत. यावर 24 तासांत शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांचे फोटो या पुरस्काराच्या अंतर्गत अपलोड करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे पहिले मानकरी आणि शहराचं विद्रुपीकरणाऱ्यांचे नावं समोर आले आहेत.
पुणेकरांच्या ताटात पोषणाचा अभाव! 81 टक्के पुरुषांमध्ये बी-12 ची कमतरता; KEM रिपोर्ट
पुणे महापालिकेने शहरात सर्वाधिक फ्लेक्स कुणाचे त्या अंतर्गत पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर 24 नोव्हेंबर 2026 रोजी या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ‘ब्रँड्स’ आणि ‘माननीय’ अशा दोन स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये माननीय म्हणजे व्यक्तींमध्ये पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचं नावं आहे.
‘You Can See Everything’ साठी अमांडा सेफ्रिड ऑस्कर कॅम्पेनसाठी सज्ज ; भारतात 27 नोव्हेंबरला रिलीज
तर कोथरूड परिसरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक तसेच त्यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे असे पृथ्वीराज शशिकांत सुतार आणि सुनील नामदेव पांडे यांचे नावं आहेत. म्हणजे एकंदरीत शहरात सर्वाधिक फ्लेक्स लावणारे भाजपचेच नेते आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे व्यावसायिक ब्रँड्समध्ये अशा प्रकारे अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांमध्ये ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कुल, आरजीस बिर्याणी स्टोरी आणि शांती शिकार यांचा समावेश आहे.