मोदींच्या 75 व्या वाढदिवशी पुण्यात अनोखा उपक्रम,”मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ!

PM Modi Birthday निमित्त पुण्यामध्ये "मिशन निर्मल" स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

PM Modi Birthday

Mission Nirmal Launch Clean up campaign for PM Modi Birthday in Pune : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे तसेच पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि स्वच्छ पॅनकार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्र.09 बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागात “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अमेरिका किंवा इस्त्राइलच्या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देऊ; इराणची अमेरिकेला थेट धमकी

या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष धीरजघाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या अभियानात विशेष उपक्रम म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा “स्वच्छतादूत” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून नागरिकांना मदत करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन टिमचाही सन्मान करण्यात आला.

अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी

यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील व भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांनी अमोल बालवडकर फाऊंडेशनने सुरु केलेल्या या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी हा परिसर संपूर्ण पुणे शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती येईपर्यंत “मिशन निर्मल” हा उपक्रम निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे मत यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या परिसराला अधिक स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहनही अमोल बालवडकर यांनी केले.

मंत्रिपद गमावलेल्या धनुभाऊंना काम मिळणार; आर्त विनवणीवर दादा पॉझिटिव्ह

याप्रसंगी मा. नगरसेवक ज्ञानेश्वर भाऊ तापकीर, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, मा. नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, कोथरुड(उ.) मंडल अध्यक्ष श्री. लहु आण्णा बालवडकर, गणेशजी कळमकर, श्री. राहुलदादा कोकाटे, शशिकांतजी बालवडकर, सचिनजी पाषाणकर, अनिकेतजी चांदेरे, काळुराम गायकवाड, शरद भोते, राजेंद्र पाडाळे, सुहास भोते, शशिकांत बालवडकर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, निकीता माताडे, वैशाली कमाजदार, जागृती विचारे, मिनाताई पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंडेंच्या विनंतीला मान देऊ, त्यावर विचार करू; अजित पवारांकडून मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत

तसेच कोथरूड उत्तर मंडलातील पदाधिकारी, पॅनकार्ड क्लब रोड स्वच्छता अभियानाचे सदस्य, सर्व मनपा आरोग्य निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी, अमोल बालवडकर फाऊंडेशन, ट्रॅफिक वॉर्डन टिम, अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

 

 

follow us