अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी

Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

Prajakt Tanpure

Prajakt Tanpure demand to Government for helps to farmers crop damage due to heavy rain : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडून अतिवृष्टीचा 75 मि.मी. चा नियम लागू असला, तरी रोज 50 मि.मी. पाऊस सतत कोसळत असल्याने शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंता तूर अवस्थेत आहेत.

मंत्रिपद गमावलेल्या धनुभाऊंना काम मिळणार; आर्त विनवणीवर दादा पॉझिटिव्ह

आज सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा, जोगेश्वरी आखाडा व येवले आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

मुंडेंच्या विनंतीला मान देऊ, त्यावर विचार करू; अजित पवारांकडून मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत

तनपुरे म्हणाले की, “शासनाने तांत्रिक बाबीत अडकून न पडता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी. अजूनही तालुक्यात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाठ्यांना मी फोन करून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे.”

हाताला काम नसणाऱ्या मुंडेंना बराशी खोदायला द्या; टोला लगावत जरांगेंचा अजितदादांना इशारा…

यावेळी त्यांच्या सोबत बाळासाहेब उंडे, प्रशांत डौले, शहाजी ठाकूर, प्रकाश भुजाडी, दादासाहेब सरोदे, सदाशिव गुंजाळ, सुखदेव काळे, गीताराम काळे, अंबादास काळे, रामेश्वर काळे, किशोर जाधव, मारुतीराव हारदे, सुनील काळे, अण्णासाहेब काळे, राहुल तागड यांच्यासह मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिले.

follow us