Imtiaz Jaleel : टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर
Imtiaz Jaleel : नाशिक शहरातील टीसीएस धर्मांतर प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जामीन मंजूर झाला आहे
Imtiaz Jaleel : नाशिक शहरातील टीसीएस धर्मांतर प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आले आहे. टीसीएस धर्मांतर आणि अत्याचारप्रकरणी जलीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
तर आता 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना नाशिक न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर माझा न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.