ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले, काही वेळातच मृतावस्थेत आढळले; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरलसोबत काय घडलं?
Lt Gen Ashok Joshi Death Pune: भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला.
Lt Gen Ashok Joshi Death Pune: पुण्यातील साळुंखे विहार परिसरात भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. थंडी जाणवत असल्याने ऊन घेण्यासाठी गच्चीवर जात असल्याचे त्यांनी घरकाम करणाऱ्या व्यक्तीला सांगितले होते. मात्र, काही वेळातच ते इमारतीच्या आवारात पडलेले आढळले. या घटनेत वयाच्या 90 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
ओव्हरटाइम, पगार अन् कॉम्पऑफ कपन्यांना काय-काय बंधनं; कर्मचाऱ्यांनो जाणून घ्या नवे नियम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जोशी हे साळुंखे विहारमधील एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. बुधवारी सकाळी ते गच्चीवर गेले होते. काही वेळाने इमारतीतील रहिवाशांना ते खाली पडलेले दिसले. त्यांनी तातडीने घरकाम करणाऱ्या व्यक्तीला याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलीने घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशोक जोशी यांनी भारतीय लष्करात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये ते सहभागी झाले होते. तसेच त्यांनी ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग’ (DGMT) म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात मुलगी आणि जावई असा परिवार आहे.