13 महापालिका अन् 114 नगरसेवक ; राज्यात MIM ची जोरदार मुसंडी का?
Maharashtra Politics : राज्यातील 29 महानगर पालिकांपैकी 24 महापालिकांवर भाजपने बाजी मारत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे
Maharashtra Politics : राज्यातील 29 महानगर पालिकांपैकी 24 महापालिकांवर भाजपने बाजी मारत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने अनेकांना धक्का देत शंभरपेक्षा जास्त जागा जिंकल्याने या पक्षाची राजयकीय वर्तुळात जोराने चर्चा होताना दिसतेय.
महापालिका निवडणुकीत एमआयएमने (AIMIM) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे (MNS) , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCPSP) आणि वंचित बहुजन आघाडीपेक्षा (VBA) जास्त जागा जिंकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. पक्षाने मुंबईसह छ.संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, सोलापूरसह तब्बल 13 महापालिकेत विजय मिळवला असून सोलापूर आणि छ.संभाजीनगर येथे मुख्य विरोधीपक्ष ठरला आहे तर नागपूर संघाच्या बालेकिल्लात देखील पक्षाने एन्ट्री केलीयं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जितकं यश एमआयएमला मिळालं नव्हतं, त्या पेक्षा जास्त मोठं यश एमआयएमला मिळालेलं असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली. तर महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे धन्यवाद एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं हे फळं असल्याची प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी दिलीये. तसेच या विजयानंतर आता जनतेच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यात यावे असे आदेश देखील त्यांनी आपल्या नगरसेवकांना दिले.
एमआयएमने छ. संभाजीनगर महापालिकेत सर्वाधिक 33 जागा जिंकले असून मालेगावात 21 तर नांदेडमध्ये 14 अमरावतीमध्ये 12, नागपूरमध्ये 7, जालन्यात 2, धुळ्यात 10, गोवंडी येथे 5, म्रुंबा येथे 6, अकोला येथे 3, अहिल्यानगर येथे 2 आणि परभणीत 1 जागा जिंकल्या आहेत.
ओवैसी बंधूंचा आक्रमक प्रचार
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून आक्रमक प्रचार पाहायला मिळाला. त्यांनी मुंबईसह छ. संभाजीनगर, मालेगाव, धुळे, अहिल्यानगर, सोलापूरसह अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत मतदानांसाठी आवाहन केले तर दुसरीकडे एमआयएमचे आमदार अकबरुदुद्दीन ओवैसी यांनी देखील छ. संभाजीनगरसह मुंबई, सोलापूर, मालेगाव आणि धुळ्यात हल्लाबोल करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता.
तिकीट वाटपावरुन गोंधळ अन् कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमकडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामुळेच बहुतेक ठिकाणी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटपाचा आरोप करण्यात आले. तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याने निवडणुकीत पक्ष कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न
काँग्रेसला मोठा फटका
निवडणुकीत एमआयएमने मुस्लीमबहुल भागात चांगली कामगिरी केल्याने काँग्रेसला मोठा फटका बसल्याचा दिसून आले. आता हळूहळू काँग्रेसची मते एमआयएमकडे जाताना दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीयं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम किंगमेकर च्या भूमिकेत राहणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते.
