Parliament special session : …म्हणून 18 अंक आहे खास; 18 व्या लोकसभेनिमित्त पंतप्रधान मोदींनी सांगितलं महत्त्व

Parliament special session : …म्हणून 18 अंक आहे खास; 18 व्या लोकसभेनिमित्त पंतप्रधान मोदींनी सांगितलं महत्त्व

PM Modi tells 18 Number Significance On 18th Loksabha special Session : आजपासून 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन (Loksabha Session) सुरू झालं आहे. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संसद परिसरामध्ये देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला त्याचबरोबर त्यांनी 18 व्या लोकसभेच्या निमित्त 18 या आकड्याचं महत्त्व (18 Number Significance) सांगितलं.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

18 या आकड्याचं महत्त्व सांगताना मोदी म्हणाले की, 18 या आकड्याबद्दल सांगायचं झालं तर भारताच्या संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये 18 या आकड्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रीमद् भगवद् गीतेचे 18 अध्याय आहेत. तसेच पुराण आणि उपपुराणांची संख्या देखील 18 आहे. तर 18 या संख्येचा मूलांक नऊ आहे आणि नऊ हा आकडा पूर्णत्वाचं प्रतिक असलेला आकडा आहे. देशात 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर नागरिकांना मतदानाचा हक्क मिळतो. त्यामुळे भारताची ही 18 वी लोकसभा देखील हा एक शुभ संकेतच आहे. हा देशाचा अमृत काळ असणार आहे. असं म्हणत मोदी यांनी 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस सुरू होण्यापूर्वी 18 या आकड्याचं महत्त्व सांगितलं आहे.

Video : तिसऱ्या टर्ममध्ये पूर्वीपेक्षा 3 पट अधिक काम करणार; अधिवेशाच्या पहिल्या दिवशी मोदींची ‘गॅरंटी’

तसेच यावेळी मोदी यांनी उद्या (25 जून) असून हा काळा दिवस लोक कधीच विसणार नाहीत. कारण या दिवशी देशात लोकशाहीचा बळी देत आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली. हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. असं म्हणत मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

मोदींसह 280 खासदार घेणार शपथ

पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर, इतर केंद्रीय मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेणार असून मंगळवारी (दि.25) 264 नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ही शपथ राज्यनिहाय दिली जाणार असून, प्रोटेम स्पीकर भर्तृहरि हरी महताब खासदारांना शपथ देतील.

https://youtu.be/3pVCdgjlM3A?si=Ws34N3EfD_2LNcAx

follow us
  • fb
  • instagram
  • youtube