Israel-Palestine : इस्रायलविरोधात संयुक्त राष्ट्रात ठराव, भारताने दिला पॅलेस्टाईनला पाठिंबा

  • Written By: Published:
Israel-Palestine : इस्रायलविरोधात संयुक्त राष्ट्रात ठराव, भारताने दिला पॅलेस्टाईनला पाठिंबा

वॉशिंग्टन : इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये (War in Israel-Palestine) सुरू असलेल्या संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली आहे.

प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास 

पॅलेस्टाईनमधील इस्रायली वसाहतींविरोधातील महत्त्वाचा ठराव गुरुवारी (९ नोव्हेंबर) संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडण्यात आला. यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ 145 देशांनी मतदान केले. तर कॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल आयलंड, फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, नाउरू, अमेरिका यांनी याच्या विरोधात मतदान केले. याशिवाय 18 देश मतदानादरम्यान गैरहजर राहिले.

संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडण्यात आलेल्या या ठरावात पूर्व जेरुसलेम आणि व्याप्त सीरियन गोलानसह पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलच्या चुकीच्या कृतींवर टीका करण्यात आली होती. ‘पूर्व जेरुसलेम आणि व्यापलेल्या सीरियन गोलानसह पॅलेस्टिनी प्रदेशातील इस्रायली वसाहती’ या शीर्षकाचा हा ठराव संयुक्त राष्ट्रात बहुमताने मंजूर करण्यात आला.

आमदार टिंगरेंना लोकायुक्तांचा दणका; केलेल्या कामांचे कोट्यावधी रुपये खिशातून द्यावे लागणार? 

गेल्या महिन्यात जॉर्डनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक प्रस्ताव आणला होता, ज्यामध्ये गाझामधील युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठरावही प्रचंड बहुमताने मंजूर झाला पण भारत त्यापासून दूर राहिला होता. UN मध्ये जॉर्डनने आणलेल्या ठरावाच्या बाजूने 120 देशांनी मतदान केले तर 14 देशांनी विरोधात मतदान केले. 45 देशांनी मतदानापासून दूर राहिले होते. ज्यामध्ये भारताचाही समावेश होता.

भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा
जॉर्डनच्या प्रस्तावापासून दुरावल्यानंतर भारताची भूमिका इस्रायलच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे मानले जात होते, परंतु आता भारताने आपली रणनीती बदलून पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. भारत सरकारच्या भूमिकेचे अनेक विरोधी पक्षांनीही कौतुक केले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले की, इस्रायलने पॅलेस्टाईनवर स्थायिकांकडून केलेला कब्जा बेकायदेशीर आहे. भारताचे हे पाऊल कौतुकास्पद आहे.

गाझामध्ये एका महिन्याहून अधिक काळ युद्ध सुरू
इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून सातत्याने युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1400 लोकांना ठार केले. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक केली. हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलही जमिनीवर लष्करी कारवाया करत आहे. यामुळे गाझामध्ये 10 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत जगभरात या युद्धाची चर्चा आहे. जगातील अनेक देश हे युद्ध थांबवण्याचे आवाहन करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube