NEET Exam Scam: अधिकाऱ्याचे कपडे फाडले, ड्रायव्हरला मारहाण; छापेमारीसाठी गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला

  • Written By: Published:
NEET Exam Scam: अधिकाऱ्याचे कपडे फाडले, ड्रायव्हरला मारहाण; छापेमारीसाठी गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला

NEET Exam Scam CBI team was attacked by villagers: वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा नीट (NEET) पेपर फुटीचे प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. पेपर फुटीतील एक आरोपी हा बिहारमधील आहे. या आरोपीच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या (CBI) टीमवर गावकऱ्यांनी हल्ला केला आहे. त्यात सीबीआय अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालकाला मारहाण करण्यात आली आहे. तर अधिकाऱ्याच्या अंगावरील कपडे फाडले आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

सोनाक्षी आणि झहीर अडकले विवाह बंधनात, मोजक्याच नाईवाईकांच्या उपस्थितीत झाला सोहळा, पाहा फोटो…

नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Paper leak) बिहारमधील फुलचंद प्रसाद याचे कनेक्शन उघडकीस आले आहे. त्याला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्याने या आरोपीच्या घरातील लोकांकडे सीबीआय तपास करत आहे. त्यामुळे आरोपी फुलचंद प्रसाद याच्या कसियाडीह येथील घरी गेले होते. त्यांच्याबरोबर नवादा पोलिस ठाण्याचे पथकही होते. फुलचंद यांची पत्नी बबिता कुमार हिच्याकडे चौकशी करून अधिकारी जात होते. तेव्हा बबिता कुमार यांचे नातेवाइक आणि गावकऱ्यांनी सीबीआयच्या टीमला घेराव घातला.

Pune Drugs : अधिकाऱ्यांकडून मंत्री शंभूराज देसाईंना हप्ता जातो; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप

सीबीआय अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेले पोलिस कर्मचारी हे नकली असल्याचे गावकरी म्हणत होते. त्यावेळी गावातील दीडशे ते दोनशे लोक एकत्र आले होते. त्यावेळी महिला पोलिस कर्मचारी काजल कुमारी यांनी गावकऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीने त्यांच्याबरोबर वाद घातला. त्यानंतर सीबीआय अधिकाऱ्याच्या वाहनचालकाला मारहाण केली. यात संजय सोनी हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सीबीआय अधिकारी यांचा शर्टही फाडला आहे.
याप्रकरणी नवादा पोलिस ठाण्यात दोनशे गावकऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील आठ जणांची ओळखही पटली आहे.

छापेमारीत काय सापडले?

नीट पेपर फुटीप्रकरणी अटक करण्यात आलेला तरुण आणि कसियाडीह गावातील तरुणीची चौकशी करण्यात येत आहे. या गावात मारलेल्या छापेमारीत सीबीआयला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. सीबीआय टीमने बँक पासबूक, निटसंबंधी काही कागदपत्रही जप्त केली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube