सोनम वांगचुक यांच्यावर केंद्राची मोठी कारवाई; एनजीओचा परकीय निधी मिळविण्याचा परवाना रद्द

एनजीओची (NGO) एफसीआरए नोंदणी रद्द केलीय. त्यामुळे त्यांना आता विदेशातून फंडिंग घेता येणार नाही.

  • Written By: Published:
Ladakh Violence, Govt Cancels FCRA Licence Of Wangchuk’s NGO

Sonam Wangchuk NGO: लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील (Ladakh) तरुण रस्त्यावर आले होते. ते तरुण हिंसक झाले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद होऊन हिंसा उसळली. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर केंद्र सरकारने (Central GOV) या हिंसेप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई सुरू केलीय. त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख एनजीओची (NGO) एफसीआरए नोंदणी रद्द केलीय. त्यामुळे त्यांना आता विदेशातून फंडिंग घेता येणार नाही.

 मोठी बातमी, प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

एनजीओने वारंवार परकीय निधी नियमांचे उल्लंघन केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने झाली आहेत. वांगचुक यांनी तब्बल चौदा दिवस यासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लावले आहे. हे हिंसक निदर्शने झाल्यानंतर 24 तासांत ही रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना विचारतो, तुमची योग्य वेळ ही पंचांग काढून सांगणार आहात का ? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

कथित उल्लंघनाची सीबीआयकडून चौकशी

यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) वांगचुक यांच्या संस्थांकडून परकीय नियमन कायद्याच्या (एफसीआरए) कथित उल्लंघनांची चौकशी सुरू केली होती. सोनम वांगचुक यांच्याकडून एफसीआरए उल्लंघनाची चौकशी काही काळापासून सुरू आहे. परंतु अद्याप याप्रकरणी एफआयआर दाखल झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गृह मंत्रालयाने काय आरोप केला ?
लडाखमधील हिंसेनंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने लगेच बुधवारी एक निवेदन जारी केला. त्यात तरुणांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर केलाय. या प्रकरणी लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी एक पत्रक जारी केले. दंगलखोरांनी तरुणांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले. जमावाने सीआरपीएफ वाहन पेटवले आणि वाहनातील सैनिकांना जिवंत जाळण्याचा त्यांचा हेतु होता. तेव्हा सुरक्षा दलांच्या जवानांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे पत्रकात म्हटले आहे.

follow us