Sonam Wangchuk : विरोध करण्याचं स्वातंत्र्य नाही, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या !

Sonam Wangchuk : विरोध करण्याचं स्वातंत्र्य नाही, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या !

लडाख : लडाखचे पर्यावरणवादी व इंजिनिअर सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याच दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की, केंद्र शासित राज्य असल्याने लडाखमध्ये सरकारला विरोध करण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही.

सोनम वांगचुक यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत लडाख पर्यावरण विषयक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, 2019 मध्ये जेव्हा लडाखला केंद्र शासित राज्य घोषित करण्यात आलं त्यावेळी लोकांच्या मोठ्या आपेक्षा होत्या. पण आता हेच केंद्र शासित राज्य लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण वितळणाऱ्या हिमनदी, संस्कृती आणि तरुणांच्या रोजगाराच्या मागणीचीही दखल घेतली जात नाही.

Pune By Poll : मनसेच्या पाठिंब्याने आमचे धाबे दणाणले, अजित पवारांकडून मनसेची खिल्ली

सोनम वांगचुक यांनी लडाखच्या आदिवासींचं रक्षण करण्यासाठी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये सामिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी लेह, लडाख आणि कारगिलमधील लोकांनी या मागण्यांसाठी बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन केले होते. यावेळी डॉ. कय्युम, असगर करबलाई, सज्जाद हुसेन, अशरफ यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान लडाखमध्ये वितळणाऱ्या हिमनद्यांना वाचवण्यासाठी मायनस 20 तापमानामध्ये सोनम वांगचुकने पाच दिवस उपोषण केलं होतं. यादरम्यान सोनम वांगचुक यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनीही उघड्यावर उपोषण केले. सोनम वांगचुकने बर्फवृष्टीदरम्यान वॉटर प्रूफ हेवी स्लीपिंग बॅग, उबदार कपडे घालून उपवास केला.

उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांनी लडाख प्रशासनाविरोधात मोर्चा उघडला. लडाख हे प्रशासकीय अव्यवस्था आणि अंधकारमय शहर असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube