मोठी बातमी, प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pranjal Khewalkar : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यासह  इतर आरोपींना  न्यायालयाकडून जामीन मंजूर

  • Written By: Published:
Pranjal Khewalkar

Pranjal Khewalkar : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यासह  इतर आरोपींना  न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील एका कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने मोठा निर्णय घेत प्रांजल खेवलकर यांना दोन महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासह पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणात अटक असणाऱ्या इतर आरोपींना देखील जामीन मंजूर केले आहे.

पोलिसांनी पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर 27 जुलै रोजी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी काही अंमली पदार्थ देखील जप्त केले होते. तसेच या पार्टीत काही महिला देखील होत्या अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र आता तब्बल दोन महिन्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने मोठा निर्णय या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर केला आहे.त्यामुळे प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांची उद्या येरवडा कारागृगातून सुटका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 27 जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना अटक केली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

Ladakh Statehood Protest: मोठी बातमी, लडाखमध्ये इंटरनेट सेवा बंद; 50 जणांना अटक

प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या प्रकरणात जोरदार राजकारण पाहायला मिळत होते. भाजपकडून एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करण्यात येत होते. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

follow us