Letsupp Exclusive : “माझ्या मागे ईडी लावण्यात अजितदादांचाच हात; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Letsupp Exclusive : “माझ्या मागे ईडी लावण्यात अजितदादांचाच हात; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : माझ्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईमागे उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या परिवारातीलच कोणाचा तरी हात आहे. तर त्यांना मदत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाईबाबत पहिल्यांचा सविस्तर भाष्य केले आहे.

लोकसभेत पाठिंबा, कोकण पदवीधरमध्ये मनसे-भाजप आमने-सामने? अभिजित पानसेंना उमेदवारी

रोहित पवार म्हणाले, कारखान्यावर छापे पडले. अनेक कारवायांना सामोरे जावं लागलं. याच्यामागे जे कोणी आहेत, त्या व्यक्तीचे नाव मी योग्य वेळ घेईल. 4 जून नंतर त्या व्यक्तीचे नाव मी सांगतो. मात्र लोकांना अंदाज आलेला आहे. कारण माझ्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाई मागे अजितदादा किंवा त्यांच्याच परिवारातील कोणीतरी आहे. तसेच त्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेत.

Pune Accident अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससूनच्या डॉ. तावरेंना अटक

मी जी भूमिका घेतली, त्यांना शरण गेलो नाही, झुकलो नाही. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा समज आहे की, मी लहान आहे. लहानांनी केवळ ऐकायचे असते, भूमिका घ्यायची नसते. त्यांना मी साहेबांबरोबर राहिल्याने वाईट वाटलं. मी जे काही धाडस दाखवलं ते भाजपच्या मोठ्या नेत्यांना आवडलं नाही. त्यामुळेच माझ्यावर ही कारवाई करण्यात आली, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

रोहित पवारांवर नेमकी काय कारवाई झाली?

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आली होती. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी प्रक्रियेत मनी लाँड्रिंगचा आरोप करत ही करावाई झाली होती. त्यानंतर रोहित पवार यांच्या बारामती अग्रोच्या मुंबईसह सहा ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर छापा टाकून ईडीने तपास केला होता. त्यांची दोनदा ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली. ईडीने त्यांच्या बारामती ॲग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त केली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यातील जमीन, शुगर प्लांट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टी अशी 161.30 एकर ची संपत्ती होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज