विशाळगडावर यासीन भटकळचं वास्तव्य! संभाजीराजेंच्या आरोपांनंतर मुश्रीफांनी मौन सोडलं
Hasan Musrif On Sambhajiraje Chatrapati : कोल्हापुरातील विशाळगडावर अतिक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यानंतर संभाजीराजेंनी प्रशासनावर आरोप केले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत कारवाईचे आदेश असतानाही प्रशासनाने कारवाई केली नसल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. यासोबतच बॉम्बस्फोटातील आरोपी यासीन भटकळ विशाळगडावर सात दिवस वास्तव्यास होता, त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) काहीच बोलत नसल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. संभाजीराजेंच्या आरोपांनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अखेर मौन सोडलंय. विशाळगडावर यासीन भटकळ राहत होता का? याची चौकशी करणार असल्याचं उत्तर मुश्रीफ यांनी दिलंय.
आता विधानसभेचं ‘झाकणं’ उडवणार? विवेक कोल्हेंची पावलं शरद पवारांच्या दिशेने…
मुश्रीफ म्हणाले, बॉम्बस्फोटातील आरोपी यासीन भटकळबाबत कालच आम्हाला समजलं आहे. यासीन भटकळ याचं विशाळगड परिसरात कोणाकडे वास्तव्य होतं, तो कुठे राहत होता? याबाबत चौकशी करणार असून जर खरंच यासीन भटकळ विशाळगडावर राहत होता तर पोलिसांनी कारवाई का केली नाही? पोलिस गप्प का बसले होते याची माहिती घेणार असल्याचं हसन मुश्रीफांनी स्पष्ट केलंय.
पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश
मागील अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबतचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते, तरीही अतिक्रमण काढण्याबाबतची कारवाई करण्यात येत नव्हती. विशाळगड परिसरात जवळपास 150 अतिक्रमणाचे प्रकरणे आहेत. त्यातील काही अतिक्रमणांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याची माहिती आहे, मात्र, अतिक्रमण काढण्याचे आदेश असेलल्या अतिक्रमणांवर कारवाई प्रशासनाकडून का केली नाही? असा सवाल संभाजीराजेंकडून करण्यात आला आहे.
विशाळगडावर काही लोकांकडून अतिक्रमणे करण्यात येत आहेत. कोणीही गडावर जात असून तिथं मद्यपान करुन बाटल्या फेकून कचरा करीत आहेत. विशाळगडावर कत्तलखाने तयारी केलेली आहे, जनावरांचे रक्त तिथं सांडल्याचं आम्हाला दिसून आले. अशातच बॉम्बस्फोटातील आरोपी यासीन भटकळ विशाळगडावर राहत होता. तो विशाळगडावर सात दिवस राहिला मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यावर काहीच बोलत नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.