पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश

पिंपरी- चिंचवडमध्ये राजकीय भूकंप, अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात 24 जणांचा प्रवेश

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनेक नेते आणि पिंपरी- चिंचवडमधील (Pimpri- Chinchwad) नगरसेवक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे.

आज पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पिंपरी- चिंचवडमधील अनेक नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांच्या नावाचा देखील समावेश आहे. तर दुसरीकडे 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड विभागातील अन्य तीन ज्येष्ठ नेत्यांनीही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते, आमदार आणि नगरसेवक शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने होत होती. मात्र आज पिंपरी- चिंचवडमधील 16 नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवरांसाठी हा मोठा मानला जात आहे. शरद पवार गटात येणाऱ्या काळात संधी मिळेल या अपेक्षेने आता अनेक नेते अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रवेश यादी

1)माजी महापौर हणमंतरावजी भोसले

2)वैशालीताई घोडेकर (माजी महापौर)

3)नगरसेवक पंकज भालेकर

4)नगरसेवक प्रवीण भालेकर

5)संगीता नानी ताम्हाणे

6) रवी आप्पा सोनवणे

7) यश साने, (नगरसेवक)

8) संजय नेवाळे

9) नगरसेवक वसंत बोराटे

10) नगरसेवक विजयाताई तापकीर

11) राहुल भोसले

12) नगरसेवक समीर मासुळकर

13) नगरसेवक गीताताई मंचरकर

14) माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे

15) सौ शुभांगी ताई बोराडे

16) सौ विनया ताई तापकीर

17) नगरसेविका अनुराधा गोफने

‘लाडका भाऊ योजनेसाठी या पद्धतीने करा अर्ज; एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

18) नगरसेवक घनश्याम खेडेकर

19) युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे

20) शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे

21)   नगरसेवक तानाजी खाडे

22) विशाल आहेर युवराज

23) नंदूतात्या शिंदे

24) शरद भाले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube