‘लाडका भाऊ योजनेसाठी या पद्धतीने करा अर्ज; एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

‘लाडका भाऊ योजनेसाठी या पद्धतीने करा अर्ज; एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ladka Bhau Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेची सुरुवात केली आहे. सध्या या योजनेची राज्यात दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालली आहे.

यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात ‘लाडका भाऊ’ योजनेची (Ladka Bhau Yojana) देखील सुरुवात केली आहे. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. या लेखात जाणून घ्या तुम्हाला या योजनेसाठी कसा अर्ज करता येणार आहे आणि कोण या योजनेसाठी पात्र ठरू शकते.

लाडका भाऊ योजना , तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार

एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सरकारकडून या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे.

तरुणांना राज्य सरकारकडून या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतही मिळणार आहे. याच बरोबर प्रशिक्षणादरम्यान 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशीलिंक असणे आवश्यक आहे.

कसा करता येणार अर्ज?

या योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन यूजर्स असेल तर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल.

त्या अर्जात तुम्हाला नाव, पत्ता आणि वयोगट भरावा लागेल.

यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरावे लागेल आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागेल.

यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सबमिट करा.

कोणाला मिळणार फायदा?

राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत राज्य सरकार प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मिळणार आहे. 18 ते 35 वर्षांच्या अर्जदारांना या योजनेत अर्ज करता येणार आहे.

Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube