महाराष्ट्र सरकारला मिळणार AI ची साथ मिळणार; गुगलसोबत मोठा करार…

महाराष्ट्र सरकारला मिळणार AI ची साथ मिळणार; गुगलसोबत मोठा करार…

Google : जगात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्सची चर्चा सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्राला आधुनिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार आणि गुगल यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात करार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीपासून उद्योग ते आरोग्यापर्यंत होणार आहे.

एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती…

या कराराबात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस कारण राज्यातील लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी हा महत्वाचा करार होतोय. AI एक्सलन्स सेंटर नागपूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आज संपूर्ण जग तंत्रज्ञानावर सुरू आहे. अशावेळी सरकारचे प्रशासन यापासून वेगळे राहू शकत नाही. कारण या तंत्रज्ञानामधे लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत विराट खेळणार का? तीन सामन्यांसाठी आज संघ ठरणार

तसेच कृषी क्षेत्रातील अडचणी AI च्या माध्यमातून दुर होऊ शकतात. महाराष्ट्र हेच स्टार्ट अपचे कॅपिटल आहे. आरोग्य क्षेत्रात देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. सरकारसोबत काम केल्याने गुगल सारख्या कंपनीचा अनुभव वाढणार आहे. मोदींनी देशातील लोकांसोबत योजना पोहोचवण्याची यंत्रणा विकसित केली. आधी योजना होत्या पण त्या लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या. हा करार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल, जाणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

करारामध्ये नेमंक काय?
उद्योजकता आणि संशोधन : गुगल स्टार्टअपला मेंटरशीप देणार, नेटवर्किंग तसेच गुगल तज्ञांच्या माध्यमातून, उद्योग जगताकडून प्रशिक्षण सेवा देणार
एआय प्रशिक्षण : राज्य सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रात गुगल प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या 500 आयटी प्रोफेशनल्सला अत्याधुनिक शिक्षण-प्रशिक्षण देणार आहे.
आरोग्य : टीबी चेस्ट एक्सरे, मधुमेह इत्यादींसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या सहाय्याने रूग्ण तपासणीसाठी तंत्रज्ञान पुरविणार
शेती : शेती, आकारमान, जलस्त्रोत, शेततळे याचे मॅपिंग, त्यामुळे डेटा आधारित निर्णयप्रक्रिया
शाश्वतता : प्रदुषणाचे रियलटाईम मॉनिटरिंग, नगरविकास, विद्युत व्यवस्था, नागरी परिवहन, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मुंबईपासून सुरुवात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube