मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, AI बाबत मोठा निर्णय
भारताला प्रथम एआय बनण्यास मदत होईल असं नडेला यांनी म्हटलं आहे. नाडेला आणि पंतप्रधान मोदी यांची ही दुसरी भेट आहे.
सध्या एआयची जगात चर्चा आहे. संपूर्ण जगाचे भविष्य हे एआयच्या (AI) हातात जाईल असंही वारंवार बोललं जात. त्यामुळे सर्वच देशांमध्ये एआय हब तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याद्वारे एआय हब उभारले जाणार आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी 17.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
शशी थरूर यांनी नाकारला वीर सावरकर पुरस्कार, नेमकं कारण काय?
ही मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळे भारताला प्रथम एआय बनण्यास मदत होईल असं नडेला यांनी म्हटलं आहे. सत्या नडेला यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘एआयच्या बाबतीत जग भारताबद्दल आशावादी आहे.माझी सत्या नडेला यांच्याशी महत्त्वाची चर्चा झाली. मला आनंद आहे की भारत असा देश बनत आहे जिथे मायक्रोसॉफ्ट आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे.
भारतातील तरुण नवीन कल्पनांद्वारे जगात क्रांती करण्यासाठी एआयच्या शक्तीचा वापर करण्यासाठी मिळणाऱ्या या संधीचा फायदा घेतील. मोदी यांनी नडेला यांच्यातील यंदाची ही दुसरी भेट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही या दोघांची भेट झाली होती. आम्हाला एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचं आहे. भारताला एआय-फस्ट बनवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मी मी उत्सुक आहे असं नाडेला या भेटीवर म्हणाले.
