Bihar Election Result 2025 : सुशासन, विकास, सामाजिक न्याय जिंकलाय-नरेंद्र मोदी

Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहे .

  • Written By: Published:
Bihar Election Result

Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन टप्प्यात पार पडलं आहे. मतदान पार पडलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही लेट्रसअप मराठीवर पाहू शकतात.

सुशासन, विकास, जनहिताची भावना, सामाजिक न्याय जिंकला आहे. हा प्रचंड जनादेश आपल्याला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नव संकल्पाने काम करण्यास सक्षम करेल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Nov 2025 06:59 PM (IST)

    अखेर तेजस्वी यादव जिंकले

    आरजेडीचे नेते तेजस्वी यादव अखेर राघोपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सतीशकुमार यांचा 14,532 मतांनी पराभव केलाय. तेजस्वी यादव यांना 1 लाख 18,597 मते मिळाली आहेत. काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर पडले होते. पण अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतले आणि विजयी झाले आहेत.

  • 14 Nov 2025 05:49 PM (IST)

    सुशासन, विकास, जनहिताची भावना, सामाजिक न्याय जिंकला आहे

    सुशासन, विकास, जनहिताची भावना, सामाजिक न्याय जिंकला आहे. हा प्रचंड जनादेश आपल्याला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नव संकल्पाने काम करण्यास सक्षम करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विजयानंतर म्हटलंय

  • 14 Nov 2025 03:20 PM (IST)

    आरजेडी नेते तेजस्वी यादव पिछाडीवर

    राघोपूर विधानसभा मतदारसंघात तेजस्वी यादव 4570 मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या तीस पैकी 12 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सतीश कुमार आघाडीवर आहेत.

  • 14 Nov 2025 01:54 PM (IST)

    बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही , संजय राऊत

    बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना 50 च्या आत संपवले! अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

  • 14 Nov 2025 01:07 PM (IST)

    Bihar Election Result 2025 : AIMIM 5 जागांवर आघाडीवर

    Bihar Election Result 2025 :
    बिहारमध्ये निवडणूक निकालांचे ट्रेंड समोर येत आहेत. निवडणूक आयोगाने सर्व 243 जागांसाठी ट्रेंड जाहीर केले आहेत. ओवेसींचा पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे.

  • 14 Nov 2025 12:37 PM (IST)

    Bihar Election Result 2025 : मोकामामध्ये अनंत सिंह आघाडीवर तर रघुनाथपूरमध्ये ओसामा

    Bihar Election Result 2025 : मोकामामध्ये अनंत सिंह आघाडीवर तर रघुनाथपूरमध्ये ओसामा

    - रघुनाथपूरमध्ये ओसामा 9236 मतांनी आघाडीवर

    अनंत सिंह 5000 मतांनी आघाडीवर

    महुआमध्ये तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर

  • 14 Nov 2025 12:12 PM (IST)

    Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाचे 243 जागांसाठीचे ट्रेंड

     निवडणूक आयोगाचे 243 जागांसाठीचे ट्रेंड

    भाजप- 84

    जेडीयू- 77

    राजद- 35

    लोजप- 22

    काँग्रेस- 7

    सीपी(एमएल)- 2

  • 14 Nov 2025 11:38 AM (IST)

    Bihar Election Result 2025 : जेडीयू सहा जागांवर 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर

    Bihar Election Result 2025 :  

    निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, सहा जागांवर जेडीयू 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहे. तर सहा जागांवर ते 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहे.

    एनडीए
    JDU - 80
    BJP - 87
    LJPR - 22
    HAM - 04
    RLM - 04

    महाआघाडी 
    RJD - 36
    INC - 05
    VIP - 0
    LEFT - 05
    IIP - 0

    इतर
    03

  • 14 Nov 2025 11:25 AM (IST)

    Bihar Election Result 2025 : तेजस्वी यादव आणि तेज प्रताप पिछाडीवर ; एनडीए 200 च्या जवळ

    नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए 200 च्या जवळ पोहचले असून  तेजस्वी यादव आणि तेज प्रताप पिछाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाचे कल दाखवत आहे.

    अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर आघाडीवर

    दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत राजदचे विनोद मिश्रा 4,000 हून अधिक मतांनी मागे आहेत.

    राघोपूरमध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर

    महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजपचे सतीश कुमार राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत, तर राजदचे तेजस्वी यादव अंदाजे 1,273 मतांनी दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

    तेज प्रताप यादवसाठीही मोठा धक्का

    महुआ विधानसभा मतदारसंघात तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर घसरले आहेत. निवडणूक आयोगाने तीन फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ही आकडेवारी जाहीर केली. चिराग पासवान यांचे उमेदवार संजय कुमार सिंह या मतदारसंघात आघाडीवर आहेत. राजदचे मुकेश कुमार रोशन दुसऱ्या स्थानावर, एआयएमआयएमचे अमित कुमार तिसऱ्या स्थानावर आणि जनशक्ती जनता दलाचे तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर आहेत.

  • 14 Nov 2025 11:14 AM (IST)

    Bihar Election Result 2025 : AIMIM ची परिस्थिती काय ?

    असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM पक्ष सध्या बैसी आणि बलरामपूर या दोन जागांवर आघाडीवर आहे. पक्षाने बैसीमधून गुलाम सरवर आणि बलरामपूरमधून मोहम्मद आदिल हसन यांना उमेदवारी दिली आहे.

    23

follow us